अ‍ॅमेझॉनचे CEO जेफ बेझोस देणार पदाचा राजीनामा

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ बेझोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या वर्षाच्या अखेरीस ते पदभार सोडेल.

वॉशिंग्टनः अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ बेझोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या वर्षाच्या अखेरीस ते पदभार सोडेल. बेजोस यांनी आपल्या कर्मचार्‍यांना पत्र लिहून या निर्णयाबद्दल माहिती दिली. मंगळवारी लिहिलेल्या पत्रात त्यांनी असे सांगितले आहे की,  अ‍ॅमेझॉन कंपनीची सीईओची भूमिका मी सोडत आहे. त्याच्या जागी अँडी जॅसी हे नविन मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत.  

“कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी मी उत्नितम प्रकारे सांभाळू शकेल. आणि अँडी जेसी कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, अशी घोषणा करून मला आनंद झाला आहे." असे जेफ बेझोस म्हणाले. जेसी सध्या अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे प्रमुख आहेत.  मेझॉनने 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीसाठी वित्तीय निकाल जाहीर केला. 2020 च्या शेवटच्या तीन महिन्यांत कंपनीने 100 अब्ज डॉलर्सची विक्री केली आहे.

1995 मध्ये जेफ बेझोसने स्टार्टअप म्हणून अ‍ॅमेझॉन लॉन्च केले होते आणि आज जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये त्यांचा क्रमांक लागतो. जेफ बेझोस यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, हा प्रवास सुमारे 27 वर्षांपूर्वी सुरू झाला होता. अ‍ॅमेझॉन ही केवळ एक कल्पना होती त्याचे नाव नव्हते. त्या काळात मला बर्‍याचदा प्रश्न विचारला जात असे की, इंटरनेट म्हणजे काय? आज आम्ही 1.3 दशलक्ष प्रतिभावान, समर्पित लोकांना नोकरी करतो. शेकडो कोट्यावधी ग्राहकांना आणि व्यवसायांना सेवा देत आहे आणि जगातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक म्हणून अ‍ॅमेझॉनची जगव्याप्त ओळख आहे.

 

 

संबंधित बातम्या