तुम्ही अमेरिकेचा आत्मविश्वास वाढविला म्हणत जो बायडन यांनी केले भारतीय वंशाच्या लोकांचे कौतुक

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

सर्वच क्षेत्रातील भारतीयांनी आपल्या कौशल्याने अमेरिकेत स्वत: चे खास स्थान मिळविले आहे. त्यांच्या योगदानाचे बायडन यांनी कौतुक केले आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी त्यांच्या प्रशासनात भारतीय वंशाच्या 55 लोकांना स्थान दिले आहे. मग ते क्षेत्र राजकीय असो की अंतरिक्ष जागेची, सर्वच क्षेत्रातील भारतीयांनी आपल्या कौशल्याने अमेरिकेत स्वत: चे खास स्थान मिळविले आहे. त्यांच्या योगदानाचे बायडन यांनी कौतुक केले आहे. बायडन यांनी आपल्या प्रशासनात मोठ्या संख्येने भारतीय-अमेरिकन लोकांचा समावेश असल्याचे नमूद केले आहे. देशात भारतीय-अमेरिकन लोकांचे वर्चस्व वाढत आहे. असे ते म्हणाले. दरम्यान बायडन नासा येथील भारतीय एयरोस्पेस अभियंता स्वाती मोहन यांच्याशी बोलत होते.

स्वाती मोहन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली

लहान असतांना 'स्टार ट्रेक' चा पहिला भाग पाहिल्यावर नासाला येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे स्वातीने बायडन यांना सांगितले. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या 'पर्सिव्हरेन्स रोव्हर' च्या मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरण्याच्या मोहिमेमध्ये स्वाती मोहन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. स्वातीने नासाच्या मार्स 2020 मोहिमेतील दिशा निर्देश, दिशा सुचक आणि नियंत्रण मोहिमेचे नेतृत्व केले आहे. 18 फेब्रुवारी रोजी पर्सीवरेंस रोव्हर यशस्वीपणे मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले होते. स्वाती एक वर्षाची होती तेव्हा तिचे कुटुंब भारतातून अमेरिकेत आले होते.

 

'स्टार ट्रेक'मुळे उत्सुकता वाढली

स्पेसविषयी तिची उत्सुकता बालपणातच निर्माण झाली. जेव्हा ती लोकप्रिय टीव्ही शो 'स्टार ट्रेक' बघायची. 'स्पेसच्या आश्चर्यकारक दृश्यांनी माझे लक्ष सर्वात जास्त वेधून घेतले आणि अंतरिक्ष अन्वेषणाच्या उद्दीष्टाने मी अभ्यास करण्यास सुरवात केली,' असे स्वातीने सांगितले. मागील महिन्यात मंगळावर सहा चाकी रोव्हर य़श्स्विरित्या उतरविण्याच्या मोहिमे बद्दल आणि अमेरिकेचा आत्मविश्वास वाढविल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी नासाच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

भारत-अमेरिकेबरोबरचा तणाव लक्षात घेता चीनच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ 

संबंधित बातम्या