अमेरिकेच्या माजी राजदूत समांथा पावर आंतरराष्ट्रीय विकास संस्थेचं नेतृत्व करणार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी  संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत समांथा पावर यांची अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेच्या अध्यक्षपदी (यूएसएआयडी) निवड केली आहे.

वॉशिंग्टन :  अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी  संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत समांथा पावर यांची अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेच्या अध्यक्षपदी (यूएसएआयडी) निवड केली आहे. त्यांच्या दिर्घ अनुभवामुळे जागतिक प्रश्नांबाबत त्यांचा गाढा अभ्यास आहे.

“पॉवर आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणत सध्याच्या काळातील सर्वात मोठी आव्हाने - कोरोना, हवामान बदल, जागतिक दारिद्र्य, लोकशाही, अल्पसंख्याकांचे प्रश्न यांचा सामना करण्यासाठी नक्कीच सर्वतोपरी प्रयत्न करतील. असं बायडन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ते म्हणाले, “संकटग्रस्त लोकांचे प्रश्न सोडवणे, मुत्सद्दीपणाने दीर्घकाळ चालणारे संघर्ष सोडविण्याचं, मानवतावादी आपत्कालीन परिस्थितीला योग्य तो प्रतिसाद देण्याचं, मानवी सन्मानाचे रक्षण करण्याचं आणि कायद्याचे व लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्याचं सामर्थ्य अ‍ॅम्बेसेडर पावर यांच्यात आहे.”

माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि तत्कालीन उपाध्यक्ष बायडन यांच्या नेतृत्वात २०१३ ते २०१७ पर्यंत यूएनमध्ये अमेरिकेच्या राजदूत म्हणून दीर्घ काळ मानवाधिकार अधिवक्ता म्ह्णून त्यांनी काम केलं आहे. ५० वर्षीय पावर यांनी २००९ ते २०१३ या काळात  व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागातही काम केलं आहे.

संबंधित बातम्या