Kabul Airport वर पुन्हा एकदा मोठ्या हल्ल्याची शक्यता- जो बायडेन

बायडेन (Joe Biden) यांनी याबाबत निवेदन देत म्हटले आहे की, काबूलमधील (Kabul) परिस्थिती अत्यंत धोकादायक झाली असून विमानतळावर आणखीन दहशतवादी हल्ल्यांचा धोका आहे.
Kabul Airport वर पुन्हा एकदा मोठ्या हल्ल्याची शक्यता- जो बायडेन
Joe Biden warns another at attack at Kabul airportDainik Gomantak

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी शनिवारी पुन्हा इशारा दिला आहे की काबुल विमानतळावर (Kabul Airport) आणखी एक दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) येत्या 24 ते 36 तासांमध्ये होण्याची शक्यता आहे.बायडेन यांनी याबाबत निवेदन देत म्हटले आहे की, काबूलमधील (Kabul) परिस्थिती अत्यंत धोकादायक झाली असून विमानतळावर आणखीन दहशतवादी हल्ल्यांचा धोका आहे. (Joe Biden warns another at attack at Kabul airport)

व्हाईट हाऊसच्या (White House) अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानातून (Afghanistan) लोकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेचे पुढील काही दिवस हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक काळ असणार आहे.

गुरुवारी हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यात आत्मघातकी बॉम्बर आणि अनेक इसिस-खोरासन बंदुकधाऱ्यांनी 13 अमेरिकन सैनिक आणि किमान 169 अफगाण नागरिकांचा बळी घेतल्यानंतर काल बायडेन यांचे हे वक्तव्य आले आहे.

"आज सकाळी मी माझी राष्ट्रीय सुरक्षा टीम आणि वॉशिंग्टनमध्ये माझ्या कमांडरशी भेटलो. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमध्ये आयएसआयएस-के या दहशतवादी संघटनेच्या विरोधात काल रात्री केलेल्या हल्ल्याबद्दल आम्ही चर्चा केली. मी म्हणालो की आम्ही यासाठी जबाबदार असलेल्या गटाच्या मागे जाऊ. काबूलमध्ये आमच्या सैनिकांवर आणि निष्पाप नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचा पूर्णपणे बदला घेतला जाईल." असे देखील जो बायडेन यांनी सांगितले आहे.

Joe Biden warns another at attack at Kabul airport
तालिबानचा प्रमुख कोण? एक फोटो सोडल्यास दुसरी माहिती नाही

ते पुढे म्हणाले, 'अमेरिकेने केलेला हा हल्ला शेवटचा नव्हता. आम्ही या नापाक हल्ल्यात सामील असलेल्या प्रत्येकाला शोधू आणि मारू. जेव्हा कोणी अमेरिकेला हानी पोहोचवेल किंवा आमच्या सैनिकांवर हल्ला करेल, तेव्हा आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. 'असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की काबूलमधील भयावह परिस्थिती असूनही आम्ही नागरिकांना बाहेर काढण्याचे काम करत आहोत. काल आम्ही शेकडो अमेरिकनांसह 6,800 इतरांना काबूलमधून बाहेर काढले आहे.

Related Stories

No stories found.