ज्यो बायडेन हे सर्वोत्तम अध्यक्ष ठरतील: हॅरिस

दैनिक गोमन्तक
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष ज्यो बायडेन हे अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वोत्तम अध्यक्ष ठरतील. बायडेन असे नेते असतील की संपूर्ण जग ज्यांचा सन्मान करेल,’’ 

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष ज्यो बायडेन हे अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वोत्तम अध्यक्ष ठरतील. बायडेन असे नेते असतील की संपूर्ण जग ज्यांचा सन्मान करेल,’’ असे प्रसंशोद्‍गार अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी शुक्रवारी काढले. 

हॅरिस यांनी ट्विवरून बायडेन यांची कौतुकाचा वर्षावच केला. त्‍या म्हणाल्या की, बायडेन हे सर्व अमेरिकी नागरिकांचे अध्यक्ष आहेत. ते अमेरिकेचे सर्वोत्कृष्ट अध्यक्ष ठरतील याची आम्हाला खात्री आहे. संपूर्ण जग सन्मान करेल असे नेता ते आहेत आणि आमची मुले त्यांच्याकडून प्रेरणा घेतील. बायडेन यांनीही ट्विवची मालिका सादर करीत देशात एकीचे आवाहन केले. ‘हा देशाचा एक नवा, धाडसी आणि अधिक कनवाळू  इतिहास लिहिण्याचा आपल्या सर्वांचा क्षण आहे.

कोरोनाच्या संसर्गाचा वेग रोखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आपल्याला दुप्पट वेगाने प्रयत्न करून कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र केला पाहिजे. आपल्या सर्वांची एकजूट आहे, हे लक्षात ठेवा,’ असे त्‍यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा:

संबंधित बातम्या