जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष

dainik gomantak
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

बायडेन यांना 284 तर ट्रम्प यांना 214 मते मिळाली. पेनिसिल्व्हियामधून मिळालेल्या निर्णायक आघाडीमुळे विजयासाठी लागणाऱ्या 270 या मॅजिक फिगरपर्यंत पोहोचणे बायडेन यांना सहज शक्य झाले. 

वॉशिंग्टन- अखेर आज तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अमेरिकेला नवा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा 70 मतांनी पराभव करत बायडेन यांनी ट्रम्प युगाचा अस्त केला आहे. बायडेन यांना 284 तर ट्रम्प यांना 214 मते मिळाली. पेनिसिल्व्हियामधून मिळालेल्या निर्णायक आघाडीमुळे विजयासाठी लागणाऱ्या 270 या मॅजिक फिगरपर्यंत पोहोचणे बायडेन यांना सहज शक्य झाले. 

मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचे स्वप्न या पराभवामुळे भंगले आहे. मागील 30 वर्षात डोनाल्ड ट्रम्प हे एकटे असे अध्यक्ष आहेत जे दुसऱ्या टर्मसाठी निवडून येऊ शकले नाहीत. 

डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या बायडेन यांची वयाच्या 78व्या वर्षी व्हाईट हाऊस मध्ये एन्ट्री होणार आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या  कमला हरिस या अमेरिकेच्या नव्या उप राष्ट्राध्यक्ष असतील. 
डोनाल्ड ट्रम्प यांचे मोदींबरोबर मैत्रीचे संबंध होते. मात्र आता अमेरिकेत सत्तापालट झाल्याने बायडेन भारताशी कसे वागतात हे बघणे महत्वाचे ठरेल.

संबंधित बातम्या