अमेरिकेत सत्तांतर..!

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये अखेरीस डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांची सरशी झाली. अखेरच्या टप्प्यात पेन्सिल्व्हानियाने हात दिल्यानंतर बायडेन यांना २७० इलेक्टोरल मतांचा टप्पा गाठता आला.

न्यूयॉर्क :  जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये अखेरीस डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांची सरशी झाली. अखेरच्या टप्प्यात पेन्सिल्व्हानियाने हात दिल्यानंतर बायडेन यांना २७० इलेक्टोरल मतांचा टप्पा गाठता आला. अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून बायडेन लवकरच शपथ घेतील.  बायडेन यांच्या विजयानंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून एकच जल्लोष सुरू केला.

अमेरिकेमध्ये व्हाइट हाऊससाठीची शर्यत उत्कंठावर्धक स्थितीमध्ये पोचली होती. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन हे अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आज  विजयाच्या आणखी समीप पोचले. याआधी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये त्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला होता तरीसुद्धा ट्रम्प मात्र अद्याप माघार घ्यायला तयार नाहीत. या निकालांना कायदेशीर आव्हान देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने जोरदार तयारी केली आहे. राजकीयदृष्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पेनसिल्व्हानियाने बायडेन यांच्या बाजूने कौल दिला.

संबंधित बातम्या