आज वर्षातील सर्वांत मोठी रात्र; ४०० वर्षांनंतर आसमंतात घडणार एक अनोखी खगोलीय घटना

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 डिसेंबर 2020

२१ डिसेंबरच्या सर्वात मोठ्या रात्रीत जेव्हा हे दोन्ही ग्रह एकमेकांसमोर असतील तेव्हा एका अनोख्या खगोलीय घटनेचे दर्शन होणार आहे.

वॉशिंग्टन- आज सूर्य अस्ताला जाताना आसमंताच्या पश्चिमेला शनि आणि गुरू ग्रह एकमेकांसमोर असणार आहेत. २१ डिसेंबरच्या सर्वात मोठ्या रात्रीत जेव्हा हे दोन्ही ग्रह एकमेकांसमोर असतील तेव्हा एका अनोख्या खगोलीय घटनेचे दर्शन होणार आहे. 

वैज्ञानिकांच्या दुनियेत दोन मोठ्या ग्रहांच्या समोरासमोर येणाऱ्या या घटनेला 'ग्रेट कंजंक्शन' पोर्णिमेला चंद्राचा आकार जेवढा मोठा दिसतो त्याचा पाचवा भाग एवढेच अंतर  या दोन ग्रहांमध्ये दिसून येते. गॅलिलियोने याच्यावर पहिला टेलिस्कोप बनवल्यानंतर १४ वर्षांत १६२३ मध्ये या दोन ग्रह एवढे जवळ असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर थेट एवढी जवळीक आता बघायला मिळत आहे. आज दिवस मावळल्यानंतर आकाशात एक विशेष खगोलीय घटना घडणार आहे. या घटनेला आपल्या डोळ्यांनी बघण्यासाठी आणि हे दृश्य टिपण्यासाठी आज अनेक खगोलशास्त्राचे जिज्ञासक इच्छूक आहेत.       
 
कोणतेही यंत्र नसतानाही बघु शकता येणार या ग्रहांमधील अंतर
खगोलीय घटनांमध्ये रस असणाऱ्यांना आजची रात्र अतिशय दुर्लभ आहे.  या वर्षाची सर्वात मोठी रात्र तसेच ४०० वर्षांनंतर घडणाऱ्या अनोख्या खगोलीय घटनेचे दृश्य बघता येणार आहे. सौरमंडलातील सर्वांत मोठा ग्रह गुरू आणि शनि या दोन ग्रहांच्या जवळ येण्याची ही घटना विना यंत्राची बघता येणार आहे. या घटनेला ख्रिसमस स्टारही म्हटले जाते.   

संबंधित बातम्या