Kabul Blast: अफगाणिस्तान हादरलं, 12 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधीलएका मशिदीच्या प्रवेशद्वारावर रविवारी मोठा बॉम्बस्फोट (Kabul Blast) झाला आहे.
Kabul Blast: अफगाणिस्तान हादरलं, 12 जणांचा मृत्यू
Kabul Blast: 12 people kills in Afghanistan near Kabul mosqueTwitter

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुलमधील (Kabul) एका मशिदीच्या (Kablul mosque ) प्रवेशद्वारावर रविवारी मोठा बॉम्बस्फोट (Kabul Blast) झाला आहे. या बॉम्बस्फोटात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 32 जण जखमी झाले आहेत. सत्ताधारी तालिबानचे (Taliban) प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद (Zabiullah Mujahid) यांच्या आईच्या मृत्यूनंतर मशिदीत नमाज अदा केली जात असताना हा स्फोट झाला आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही पण संशय आयएस या दहशतवादी संघटनेवर आहे.(Kabul Blast: 12 people kills in Afghanistan near Kabul mosque)

या प्रकरणातील तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. काबूलमधील ईदगाह मशिदीच्या बाहेर ही घटना घडली असून स्फोटानंतर जबीउल्लाहने ट्वीट करून घटनेत निष्पाप नागरिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे . या स्फोटात कोणताही तालिबान नेता किंवा सेनानी जखमी झाला नाही. तालिबान सरकारच्या अंतर्गत मंत्रालयाने पाच नागरिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. काबुलमध्ये इटालियन सरकारच्या पाठिंब्याने चालणाऱ्या हॉस्पिटलने चार जखमींना दाखल केल्याची पुष्टी केली आहे.

या घटनेनंतर आजूबाजूचा परिसर तालिबान्यांनी वेढला गेला आणि सामान्य जनतेची हालचाल बंद झाली. पण काही तासांनी हा भाग पूर्णपणे मोकळा झाला. स्फोटामुळे मशिदीच्या प्रवेशद्वाराचे किरकोळ नुकसान झाले आहे . तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा केल्यापासून अफगाणिस्तानमध्ये आयएस या दहशतवादी संघटनेकडून सातत्याने हल्ले होत आहेत. 26 ऑगस्टला काबूल विमानतळाजवळ सर्वात मोठा हल्ला झाला होता.

Kabul Blast: 12  people kills in Afghanistan  near Kabul mosque
तालिबानच्या विजयाचा अमेरिकेले धसका : इम्रान खान

त्या हल्ल्यात 169 अफगाण आणि 13 अमेरिकन लष्करी जवान मारले गेले होते. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांकडून हल्ले वाढले आहेत. बहुतेक हल्ल्यात तालिबान लढाऊंना लक्ष्य करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यांमुळे तालिबान आणि इस्लामिक स्टेट या दोन अतिरेकी गटांमध्ये व्यापक संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इस्लामिक स्टेट अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नांगरहार प्रांतात खूप मजबूत आहे. तो तालिबानला आपला कट्टर शत्रू मानतो. इस्लामिक स्टेटने तालिबानवर अनेक हल्ले केल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यांचे केंद्र प्रांतीय राजधानी जलालाबाद होते. जलालाबादमध्ये इस्लामिक स्टेटने अनेक हल्ले केले आहेत, ज्यात मोठ्या संख्येने लोक मारले गेले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com