Watch: कंगाल पाकिस्तानात धर्मांधतेचा कळस! मशिदीवर खुलेआम हल्ले...

Mosque Attack In Pakistan: आपल्या चुकीच्या धोरणांमुळे पाकिस्तान विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
Karachi Mosque Attack
Karachi Mosque AttackDainik Gomantak

Karachi Mosque Attack: आपल्या चुकीच्या धोरणांमुळे पाकिस्तान विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. उपासमारीची परिस्थिती आहे. दुसरीकडे, खाद्यपदार्थांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत.

दरम्यान, पाकिस्तानमधून (Pakistan) मानवतेला लाजवेल असा एक व्हिडीओ समोर आला आहे. पाकिस्तानातील कराचीमध्ये एक अहमदिया मशीद दिवसाढवळ्या पाडण्यात आली. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मशीद पाडल्याचा हा व्हिडिओ 2 फेब्रुवारीचा असल्याचा दावा केला जात आहे.

Karachi Mosque Attack
Pakistan Economic Crisis: जिन्नांच्या पाकिस्तानला IMF कडून 'जोर का झटका', देश उध्वस्त होण्याच्या मार्गावर...

कादियानी मशिदीवर कट्टरवाद्यांचा हल्ला

मीडिया रिपोर्ट्सनुसार कट्टरवाद्यांनी कराचीतील हाशू मार्केट सदर येथील कादियानी मशिदीवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. त्यातच काही धर्मांध कराचीत बांधलेल्या मशिदीचे मिनार उघडपणे फोडत आहेत.

अहमदिया मशीद फोडणारे लोक तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानचे (टीएलपी) सदस्य असल्याचा आरोप आहे. त्यांनी मशीद फोडली कारण हे प्रार्थनास्थळ अहमदिया समुदयाचे होते.

कट्टरतावाद्यांनी मिनार फोडले

स्थानिक लोकांनी सांगितले की, कराचीमध्ये (Karachi) अहमदी समुदायाच्या मशिदीवर धर्मांधांनी अचानक हल्ला केला. पोलिसही त्यांना रोखू शकले नाहीत. काही लोकांनी तोंड लपवले होते, तर काहींनी उघडपणे मशिदीवर हल्ला चढवला. आपली ओळख उघड होण्याची भीतीही त्यांना वाटत नव्हती.

Karachi Mosque Attack
Pakistan Crisis: कंगाल पाकिस्तानची हुकूमशाहीकडे वाटचाल, 'या' अहवालातून धक्कादायक खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मांध लोक शिडीच्या साहाय्याने मशिदीच्या छतावर पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी मशिदीचे मिनार तोडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांचे (Police) म्हणणे आहे. हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

अहमदी मशिदीवर महिनाभरात दुसऱ्यांदा हल्ला झाला

मिळालेल्या माहितीनुसार, कादियानी मशिदीवर हल्ल्याची ही घटना एका महिन्यात दुसऱ्यांदा घडली आहे. नुकताच पेशावरमधील मशिदीत आत्मघाती हल्ला झाला. या घटनेत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा समावेश आहे. स्फोट इतका भीषण होता की, मशिदीचा काही भाग कोसळला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com