Harvinder Singh Rinda: पाकचा पर्दाफाश, अतिरेकी रिंदाचा ड्रगच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू

Khalistani Terrorist Death: पाकिस्तानचे नापाक इरादे साऱ्या जगाला माहीत आहेत.
Harvinder Singh Rinda
Harvinder Singh RindaDainik Gomantak

Khalistan Latest Update: पाकिस्तानचे नापाक इरादे साऱ्या जगाला माहीत आहेत, तरीही तो खोट्याच्या मुखवट्याखाली आपले गुन्हे लपवण्याचा प्रयत्न करतो. दहशतवादी मशिन तयार करण्याचा पाकिस्तानचा उद्देश आता साफ झाला आहे.

दरम्यान, जगामध्ये भारताविरोधात (India) दहशत पसरवणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय तर दिला आहेच, शिवाय या दहशतवाद्यांच्या नापाक मनसुब्यांमध्ये सामील असल्याने त्यांचे आश्रयस्थान बनला आहे. भारतात आणि विशेषत: पंजाबमध्ये दहशत पसरवणारा दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा ड्रग्जच्या अतिसेवनाने मृत्यू झाला असून त्याचा पाकिस्तानमधील (Pakistan) रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

Harvinder Singh Rinda
Imran Khan: अमेरिका मालक, पाकिस्तान भाड्याची बंदूक; इम्रान खान विरोधकांवर हल्लाबोल

दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा मृत्यू

दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा हा भारतीय एजन्सीसाठी डोकेदुखी ठरला होता. यापूर्वीच्या अनेक घटनांमध्ये रिंदाचे नाव समोर आले होते. रिंदाचे पंजाबमधील टोळ्यांशीही संबंध होते. ज्यांच्या माध्यमातून तो भारतात विशेषतः पंजाबमध्ये दहशत पसरवत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात आश्रय घेतलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याचा इस्लामाबादमधील (Islamabad) रुग्णालयात मृत्यू झाला. त्यापूर्वी त्याला लाहोरमधील रुग्णालयातही नेण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्याला लष्करी रुग्णालयात हलवावे लागले. इथेही डॉक्टरांना त्याचा जीव वाचवता आला नाही आणि त्याचा मृत्यू झाला.

Harvinder Singh Rinda
Pakistan: FATF च्या ग्रे लिस्टमधून पाकिस्तान बाहेर, 4 वर्षानंतर मोठा दिलासा

पंजाब सरकार अडचणीत आले

गेल्या अनेक दिवसांपासून रिंदाने पंजाब सरकारला अडचणीत आणले होते. रिंदा हा पंजाबमधील टार्गेट किलिंग आणि दहशतवादाच्या अनेक कारवायामध्ये सामील होता. रिंदाच्या माध्यमातून आयएसआयने पंजाबमध्ये ड्रोनच्या मदतीने शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरु केला होता. यासोबतच रिंदाने पंजाबमध्ये आपले नेटवर्क तयार केले होते. त्याने दहशतवादी कारवायांसाठी गुन्हेगार तयार करण्यास सुरुवात केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com