फ्रान्सच्या कारवाईत ५० दहशतवादी ठार

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या मालीस्थित बर्कान दलाने हवाई हल्ला करत ५० हून अधिक जिहाद्यांना ठार मारले.

 पॅरिस : फ्रान्स आणि मुस्लिम देश यांच्यात वाद सुरु असतानाच फ्रान्सने माली येथे हवाई हल्ला करत किमान ५० दहशतवाद्यांना ठार केले. हे सर्व दहशतवादी अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते, असा फ्रान्सचा दावा आहे. ३० ऑक्टोबरला फ्रान्सने हा हल्ला केला होता. 

फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या मालीस्थित बर्कान दलाने हवाई हल्ला करत ५० हून अधिक जिहाद्यांना ठार मारले. त्यांची शस्त्रेही नंतर ताब्यात घेण्यात आली. या कारवाईमुळे अल कायदाची मोठी हानी झाल्याचा दावाही फ्रान्सने केला आहे. 

फ्रान्सने २०१४ पासून मालीमध्ये दहशतवादविरोधी मोहिम सुरु केली आहे. फ्रान्समधील शिक्षकाची हत्या, अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे विधान आणि त्यानंतर पॅरीसमध्ये पुन्हा झालेला दहशतवादी हल्ला यानंतर फ्रान्स आणि इतर मुस्लिम देशांमध्ये वाद सुरु आहे. हा वाद अद्याप पेटलेला असतानाच फ्रान्सने हा हल्ला करत सामर्थ्याचे प्रदर्शन केले आहे

संबंधित बातम्या