किम जोंग यांच्या बहिणीची अमोरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना धमकी

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 16 मार्च 2021

तुमची झोप उडेल असा कोणत्याही स्वरुपाचा निर्णय घेऊ नका अशा शब्दात किम यो जोंग यांनी धमकावलं आहे.

उत्तर कोरिया अंतरराष्ट्रीय राजकारणात वेगवेगळ्या कारणांसाठी सतत चर्चेत असतो. आता उत्तर कोरियाने चक्क अमेरिकेला धमकी दिली आहे. उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना इशारा दिला आहे. 'तुमची झोप उडेल असा कोणत्याही स्वरुपाचा निर्णय घेऊ नका', अशा शब्दात किम यो जोंग यांनी धमकावलं आहे. विशेष म्हणजे बाय़डन प्रशासनातील काही अधिकारी टोकियो आणि सियोलमध्ये दाखल झाले असताना उत्तर कोरियाने हा इशारा दिला आहे. तसेच अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध पुन्हा एकदा ताणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किम यो जोंग या किम जोंग यांच्या सल्लागार आहेत.

बायडन प्रशासनाला उत्तर कोरियाने पहिल्यांदाच थेटपणे धमकी दिली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात सुरु असणाऱ्या संयुक्त अभ्यासाला उत्तर कोरियाने आधीच विरोध केला आहे. किम जोंग यांनी अमेरिकेला इशारा देताना, ''पुढील चार वर्षे तुम्हाला सुखाने झोपण्याची इच्छा असेल तर आम्हाला उकसावण्याचा प्रयत्न करणारं कोणतही पाऊल नका,'' असं म्हटलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी आणि संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टीन उत्तर कोरिया आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जपान आणि उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यानिमित्त अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्री आशियामध्ये दाखल झाल्यानंतर उत्तर कोरियायाकडून अमेरिकेला हा इशारा देण्यात आला आहे.

सॅंडस्टॉर्म: चीनी हवामान प्रशासनाने बीजिंगमध्ये येलो अलर्ट जाहीर केला

मंगळवारी उत्तर कोरियाने या संबंधीचे अधिकृत पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेचे दोन्ही मंत्री टोकियोमधील एका चर्चासत्रात सहभागी होते त्यानंतर उद्या सियोलमध्ये उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. उत्तर कोरियामधील अंतर्गत बाबीविषयी सर्व जबाबदाऱ्या संभाळणाऱ्या किम यो जोंग यांनी, उत्तर कोरियाला दक्षिण कोरियासोबत सहकार्य करावसं वाटलं नाही तर 2018 मध्ये केलेल्या करारामधून बाहेर पडण्याचा आम्ही निर्णय घेऊ शकतो असं म्हटलं आहे. तसेच दोन्ही देशांमधील शांतता राखण्यासाठी दहा वर्षापूर्वी तयार करण्यात आलेली समिती बरखास्त करण्याची धमकी यावेळी किम यो जोंग यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या