Ethiopias Bodi Tribe: व्वा क्या बात है! पोट वाढलं असेल तर इथे मिळतो सुपरस्टारचा ताज; वाचा जरा हटके गोष्ट

या देशात जास्त पोट असलेल्या पुरुषांना अधिक मान दिला जातो.
Ethiopias Bodi Tribe
Ethiopias Bodi TribeDainik Gomantak

Ethiopias Bodi Tribe: सध्या अनेक लोक वजन कसे कमी करवे यासाठी नवनवे उपाय शोधत असतात. फास्टफुड आणि धावपळीच्या लाईपस्टाइलमुळे लोक वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत. निरोगी राहण्यासाठी आपली लाईफस्टाईल चांगली असने आवश्यक आहे.

चुकीच्या लाईपस्टाईलमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. यामुळे अनेक आजारांना उद्भउ शकतात. एकीकडे लोक वजन कमी करण्यासाठी डाएट आणि योगा असे अनेक उपाय करत असतात.

तर दुसरीकडे काही लोक असेही आहेत, जे वजन वाढण्यासाठी खुप मेहनत घेतात. याचे कारण म्हणजे जगाच्या एका कोपऱ्यामध्ये असे एक ठिकाण आहे, जिथे वाढलेले पोट असणाऱ्या पुरुषांना अधिक मान दिला जातो. चला तर मग जाणून घेउया कोणते आहे हे ठिकाण.

  • पुरुषांचे पोट वाढले असेल मिळतो सुपरस्टारचा ताज

या ठिकाणी जास्त पोट सुटलेल्या पुरुषांना सुपरस्टारचा दर्जा मिळतो. जगभरात अनेक विविध जमाती आहेत, ज्या आजही आपल्या परंपरांचे पालन करतात. अशीच एक जमात आहे त्यांची एक विचित्र परंपरा आहे. आफ्रिकेच्या जंगलामध्ये राहणाऱ्या एका जमातीमध्ये ही परंपरा आहे. जंगलात राहणाऱ्या बोडी जमातीमधील लोक ही परंपरा अजूनही पाळतात. या परंपरेनूसार ज्या पुरुषाचे पोट जास्त असते त्याला अधिक मान दिला जातो.

Ethiopias Bodi Tribe
Google CEO Sundar Pichai: 12000 कर्मचाऱ्याना नारळ दिल्यानंतर आता गुगलचा मोठा निर्णय, पिचाई उचलणार मोठे पाऊल
  • लठ्ठ होण्यासाठी करतात या गोष्टीचे सेवन

आफ्रिकेच्या जंगलामध्ये राहणाऱ्या बोडी जमातीमध्ये एक विचित्र परंपरा आहे. या जमातीमधील पुरुष पोटावरची चरबी वाढण्यासाठी खुप मेहनत घेतात. यासाठी ते लोक प्राण्यांचे रक्त पितात. ज्या पुरुषाचे पोट जास्त त्याला सुपरस्टारचा ताज दिला जातो.

  • वजन वाढवण्यासाठी पितात प्राण्यांचे रक्त

एका अहवालानुसार ओमो व्हॅलीच्या जंगलात राहणाऱ्या बोडी जमातीचे लोक गाईचे दूध आणि रक्त पितात. हे लोक गाईचे दूध आणि रक्त एकत्र मिक्स करुन पितात. प्राण्यांचे रक्त पिण्यासाठी प्राण्याला मारत नाहीत, तर त्याच्या शरीरातील नस कापून तेथून त्याचे रक्त काढतात.

दरवर्षी येथे नवीन वर्षाच्या (New Year) निमित्ताने कोयल नावाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या समारंभात पुरुषांमध्ये एक स्पर्धा आयोजित केली जाते. ज्यामध्ये अविवाहित पुरुषांना गाईचे दूध आणि रक्त मिक्स करुन प्यावे लागते.

  • सहा महिन्यांपूर्वी सुरू होते स्पर्धेची तयारी

या स्पर्धेत भाग घेणारे पुरुष सहा महिने आधीपासूनच तयारी सुरू करतात. या काळात त्यांना कोणत्याही महिलेशी (Women) संबंध ठेवता येत नाही. तसेच घराबाहेर पडता येत नाही. त्यांना वजन वाढण्यासाठी प्राण्याचे रक्त आणि दूध प्यावे लागते. या पुरुषांना दोन लिटर दूध आणि त्यात मिसळलेले रक्त सूर्योदयाच्या वेळी प्यावे लागते.

  • विजेत्याला मिळते हे बक्षिष

या स्पर्धेतील विजेत्याला जमातीत सुपरस्टारचा दर्जा दिला जातो. या विधीमध्ये पुरुष देखील हेडबँड घालतात. ज्यामध्ये पंख असतात. जमातीतील स्त्रिया शेळीचे कातडे घालतात आणि या स्पर्धेचा विजेता आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न करु शकतो.

बोडी जमातीत लांब कंबर असलेल्या मुलींना सुंदर म्हटले जाते. उत्सवाच्या शेवटी गायीचा बळी दिला जात. ज्यासाठी एक पवित्र दगड वापरला जातो. कार्यक्रमादरम्यान पुरुषांना राख आणि मातीने आंघोळ घातली जाते. यानंतर एक मेजवानी आयोजित केली जाते ज्यामध्ये महिला 'हेत' नावाचे विशेष नृत्य करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com