कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात फाशीविरुध्द मागता येणार दाद

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जून 2021

आता पाकिस्तानच्या संसदेमध्ये कुलभूषण यांच्यासंदर्भातील एक महत्वपूर्ण विधेयक संमत करण्यात आले आहे.

भारताचे (India) माजी नौदल अधिकारी (Naval officer) असणाऱ्या कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांना हेरगिरीच्या नावाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता पाकिस्तानच्या(Pakistan) संसदेमध्ये कुलभूषण (Kulbhushan) यांच्यासंदर्भात एक महत्वपूर्ण विधेयक संमत करण्यात आले आहे. या विधेयकानुसार फाशीच्या शिक्षेविरोधात पाकिस्तानच्या उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (International Court of Justice) दिलेल्या निकालाच्या आधारे कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात (High Court) दाद मागता येणार आहे.

कुलभूषण जाधव यांना 2016 साली पाकिस्तानने बलुचिस्तानमधून (Balochistan) अटक करण्यात आली होती. आणि 2017 मध्ये लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या नावाखाली दोषी ठरवत फाशीची शिक्षा दिली होती. मात्र दुसरीकडे भारताने पाकिस्तानचा दावा खोडून काढत कुलभूषण जाधव यांचं अपहरण केल्याचा दावा केला आहे. इराणमध्ये (Iran) कुलभूषण व्यापार करण्यासाठी गेले होते असं भारताने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 2018 मध्ये कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. (Kulbhushan Jadhav can appeal against the death sentence in the High Court of Pakistan)

भारतीय वंशाच्या व्यक्तींना अमेरिकेत मिळते दुय्यम दर्जाची वागणूक

पाकिस्तानमधील संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने नवा कायदा संमत केला आहे. 21 सदस्यीय समितीने परवानगी दिल्यानंतर हा नवा कायदा संमत झाला आहे. विशेष म्हणजे या नव्या कायद्याला आंतरराष्ट्रीय कायदा असे नाव देण्यात आले आहे. संपूर्ण पाकिस्तानमध्ये हा कायद एकाच वेळी लागू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या आगोदर कुलभूषण प्रकरणामध्ये पाकिस्तानच्या संसदेत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर यासंदर्भातील आध्यादेश जाहीर करण्यात आला होता. आता याचं कायद्यामध्ये रुपांतर झाले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशासंदर्भातील हा नवा कायदा आहे. या कायद्यानुसार उच्च न्यायालयाला अधिक अधिकार देण्यात आले आहेत. परदेशी व्यक्तीच्या हक्कासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने परदेशी व्यक्तीच्या हक्कासंदर्भात व्हिएन्नामधील (Vienna) आंतरराष्ट्रीय कराराच्या आधारे किंवा विदेशी  व्यक्तीला असणाऱ्या कायदेशीर अधिकारांअंतर्गत सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने पुनर्विचार करता येणार आहे.

पाकिस्तानातील भारतीय दूतावासाला धोका

एकादी परदेशी व्यक्ती स्वत: किंवा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा त्याच्या देशाच्या काऊन्सिलर ऑफिसरच्या (Counselor's Office) माध्यमातून पाकिस्तानातील उच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करु शकतो. लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेवर पुनरावलोकन आणि पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे हक्क देण्यात आले आहेत. यामध्ये 1952 च्या कायद्याअंतर्गत सुनावण्यात आलेल्या खटल्यांवरही पुनर्विचार याचिका दाखल करता येणार आहे.  या निर्णयामुळे कुलभूषण जाधव यांना आता भारतीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा वकिलांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेच्या विरुध्द पुन्हा याचिका दाखल करता येणार आहे.

संबंधित बातम्या