जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यात पॉप सुपरस्टार लेडी गागा राष्ट्रगीत सादर करणार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

20 जानेवारी रोजी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

वॉशिंग्टन : 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.  या शपथविधीदरम्यान पॉप सुपरस्टार लेडी गागा राष्ट्रगीत गाणार असून, जेनिफर लोपेझही या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहे. निवडणुकीचे निकाल बदलण्याच्या उद्देशाने गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या कॅपिटलवर हल्ला झाल्यानंतर असा प्रकार पुन्हा होण्याची शक्याता असल्याने वॉशिंग्टनमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल मॉल इथ पार पडणाऱ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून गर्दी न करण्याचं आवाहन स्थानिक अधिकारी लोकांना करत आहेत. शपथविधीसीठी सहसा शेकडो हजारो लोक नॅशनल मॉलला गर्दी करतात, मात्र यावर्षी कोरोनामुळे बऱ्याच जणांना येणे शक्य नसल्याने त्यांचे प्रतिनिधीत्व म्हणून जागी, "ध्वजांचे फील्ड" लावण्यात येणार आहेत. टॉम हँक्स हा 90 मिनिटांचा शपथविधी सोहळ्याचं निवेदन करणार असून, जॉन बॉन जोवी, जस्टिन टिम्बरलेक आणि डेमी लोवाटो हेदेखील सादरीकरण करतील.

संबंधित बातम्या