वॉटरशीप बघून तुम्हीही व्हाल हैराण; जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

सध्या एक फोटो फेसबुक, ट्विटरवर चर्चेचा विषय बनला आहे, ज्यात पाण्याचे मोठे जहाज हवेमध्ये तरंगताना दिसत आहे.

स्कॉटलंड: जगात दररोज बऱ्याच विचित्र घटना घडत असतात. पूर्वीच्या काळात अशा घटना घडूम गेल्या तरी पत्ता लागायचा नाही. पण आता सोशल मीडियाचे युग आहे, जिथे गोष्टी लगेच व्हायरल होतात. सध्या एक फोटो फेसबुक, ट्विटरवर चर्चेचा विषय बनला आहे, ज्यात पाण्याचे मोठे जहाज हवेमध्ये तरंगताना दिसत आहे.

जर तुम्हाला मार्व्हल चित्रपट आवडत असेल तर तुम्ही 2012 चा द अ‍ॅव्हेंजर्स पाहिला असेलच. या चित्रपटामध्ये निक फ्यूरी सर्व सुपरहिरोंना पाण्याच्या जहाजात नेतो, जे जहात काही काळानंतर हवेत उडायला लागतं.  जरी हा एक काल्पनिक देखावा होता, परंतु आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात पाण्याचे एक मोठे जहाज हवेत उडताना दिसत आहे. त्यानंतर त्याची तुलना निक फ्यूरी शिपशी केली जोत आहे.

हा व्हायरल होत असलेला फोटो स्कॉटलंडच्या बैंफचा आहे, जिथे 23 वर्षीय कॉलिन मॅकॅलम भेट देत होता. जेव्हा तो समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचला तेव्हा त्याने हवेत उडणारे जहाज पाहिले. त्याने ताबडतोब त्याचा फोन काढला आणि जहाजाचा फोटो काढला. यानंतर त्याने हा फोटो सोशल मीडियावर टाकला. ही घटना 27 फेब्रुवारीच्या सुमारास घडली, परंतु एका आठवड्यानंतर ती जगभरात चर्चेचा विषय ठरली.

देशाला संबोधित करतांना इम्रान खान भाषण विसरले व्हिडीओ व्हायरल

काय आहे फोटोचे सत्य?

वास्तविक ही संपूर्ण घटना समुद्राच्या किनाऱ्यावरची आहे. मॅकलम तिथल्या रस्त्याने जात होता. यावेळी एक जहाज पाण्यात उभे होते. त्याच्यावर ढगाळ वातावरण होते, ज्यामुळे ढगांची सावली समुद्राच्या काही भागावर पडली आणि पाणी जमीनीसारखे दिसू लागले. यामुळे जहाज काही अंतरावरुन हवेत हजर झाले. हा एक प्रकारचा ऑप्टिकल भ्रम होता म्हणजेच डोळ्यांची फसवणूक. स्वत: मॅकलम यांनी हे संपूर्ण वाक्य लोकांशी शेअर केले. त्यांनी फेसबुकवर लिहिले की आज मी प्रथमच ऑप्टीकल गोंधळाचे थेट उदाहरण पाहिले. यानंतर त्यांच्या पोस्टवर मोठ्या संख्येने लोकांनी कमेंट कले, भाष्य केले.
 

संबंधित बातम्या