फ्रान्सचे माजी अध्यक्ष सरकोझी यांच्यावर खटला; 1 वर्षाची होऊ शकते शिक्षा

NICOLAS SARKOZY
NICOLAS SARKOZY

पॅरिस: 2012 च्या निवडणुकीत मंजूर रकमेपेक्षा जास्त खर्च केल्याच्या आरोपावरून फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सरकोझी (Nicolas Sarkozy) यांच्यावर गुरुवारी खटला चालविला गेला. हा घोटाळा असा होता की त्यांनी कंझर्व्हेटिव्ह पार्टीला (Conservative Party) कठीण परिस्थितीमध्ये टाकले होते. सरकोझी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ठरवून दिल्यापेक्षा जास्त खर्च केला होता. 2.75 कोटी डॉलर्स (200 कोटी रुपये)  एवढा खर्च केला होता.  हा खर्च जवळपास दुप्पट असल्याचा आरोप सरकोजी यांच्यावर आहे. या निवडणुकीत सरकोझी यांना समाजवादी उमेदवार फ्रँकोइस होलांडे (François Hollande) यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. तथापि, सरकोझी यांनी हे सर्व चुकीचे असल्याचे म्हणत या गोष्टीला नकार दिला आहे.

सारकोझी दोषी आढळल्यास त्यांना एक वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. त्याशिवाय त्यांना 4,580 डॉलर्सचा (3,34,000 रुपये) दंडही होऊ शकतो. सरकोझी यांच्याविरुद्ध खटला मार्चमध्येच सुरू होणार होता. पण कोरोनामुळे वकिलाला रुग्णालयात जावं लागल्याने खटला पुढे ढकलण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी 22 जूनपर्यंत पूर्ण होईल.(The lawsuit against Sarkozy, the former president of France)

सरकोझी यांना दुसर्‍या एका प्रकरणात भ्रष्टाचारासाठी दोषी ठरवले गेले आहे, ज्याला त्यांनी आवाहन दिले आहे. फ्रान्समध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर 1990 पासून निवडणूक प्रचारावरील खर्च मर्यादित केला होता. एका तपास अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की ''सारकोझी यांनी निवडणुकीदरम्यान मोर्चांवर बराच खर्च केला होता.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com