भारत-चीन संबंधांमध्ये 'फिंगर' ची मोठी भूमिका; जाणून घ्या

भारत-चीन (Indo-China) सीमा वादासंदर्भातील बातम्यांमध्ये पॅनगॉन्ग लेक (Pangong Lake), फिंगर -4 एरिया आणि एलएसीचा सतत उल्लेख केला जात आहे.
भारत-चीन संबंधांमध्ये 'फिंगर' ची मोठी भूमिका; जाणून घ्या
LACDainik Gomantak

भारत-चीन (Indo-China) सीमा वादासंदर्भातील बातम्यांमध्ये पॅनगॉन्ग लेक (Pangong Lake), फिंगर -4 एरिया आणि एलएसीचा सतत उल्लेख केला जात आहे. अलीकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही याचा उल्लेख केला आहे. फेब्रुवारीमध्ये असे म्हटले जात होते की, चीनने फिंगर -4 क्षेत्रावर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. चीननेही या भागामध्ये निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र या भागामध्ये भारताचा हा कूटनीतिक विजय झाला असल्याचे मानण्यात येत आहे. दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये या फिंगर-4 ची नेमकी भूमिका काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? फिंगर -4 (Finger-4) भारतासाठी का? महत्त्वाचे आहे. संपूर्ण फिंगर क्षेत्राबद्दल तुम्हाला जाणून घेण्यास नक्की आवडेल यासह, LAC वरुन देखील भारत-चीन यांच्यात वाद आहे.

भारत-चीन संबंधांमध्ये फिंगर हा मोठा घटक

1- भारत आणि चीनमध्ये फिंगर -4 आणि फिंगर -8 संदर्भात अजूनही एक गुंतागुंतीची परिस्थिती आहे. नेमकं हे फिंगर नेमके काय आहे? वास्तविक, काही वर्षांपासून चीन पॅनगॉन्ग लेकच्या बाजूने रस्त्यांचे जाळे विणत आहे. भारताने 1999 मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानसोबत लढत असताना दुसरीकडे चीनने पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली होती. चीनने भारताच्या सीमेवरील पॅनगॉन्ग लेकच्या परिसरामध्ये पाच किलोमीटर लांबीचा रस्ता बांधला होता.

LAC
भारत-चीन यांच्यातील चर्चेच्या 13 व्या फेरीत पूर्व लडाखबाबत तोडगा नाहीच

2- वास्तविक, पेंगोंग झीलचा परिसर नापिक आहे. त्यास स्थानिक भाषेत छांग चेन्मो म्हणतात. या टेकड्यांच्या उंचावलेल्या भागाला भारतीय लष्कराने 'फिंगर' म्हटले आहे.

3- भारताचा दावा आहे की, LAC ची सीमा फिंगर -8 पर्यंत आहे. तर चीनचा दावा आहे की LAC फक्त फिंगर -2 पर्यंत आहे. आठ वर्षांपूर्वी चिनी सैन्याने फिंगर -4 वर कायमस्वरूपी बांधकाम करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारताच्या विरोधामुळे ते मोडून काढण्यात आले. भारताचे नियंत्रण फक्त फिंगर -4 पर्यंत आहे. फिंगर -8 वर चीनची लष्करी पोस्ट आहे.

LAC
LAC वर भारत-चीन सैन्य पुन्हा आमने सामने

4- गस्त घालताना दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर असतात. सध्याच्या भारत-चीन यांच्यातील तणावानंतर भारतीय लष्कराने गस्त वाढवून फिंगर -8 केली आहे. मे महिन्यात फिंगर -5 च्या क्षेत्रात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. चिनी सैन्याने फिंगर -4 वरुन भारतीय सैनिकांना पुढे जाण्यापासून रोखले होते.

LAC म्हणजे काय?

LAC ही भारत आणि चीनमधील रेषा आहे, जी दोन्ही देशांच्या सीमा विभक्त करते. दोन्ही देशांचे सैन्य LAC वर आपआपल्या भागात सतत गस्त घालत असतात. भारत-चीन सीमेला विभाजित करणारी एलएसी तीन विभागांमध्ये विभागली गेली आहे. पहिले क्षेत्र अरुणाचल प्रदेश ते सिक्कीम आहे. दुसरा सेक्टर हिमाचल प्रदेश ते उत्तराखंडला लागून आहे. तिसरे क्षेत्र लडाख आहे. पूर्व लडाख LAC चे पश्चिम क्षेत्र आहे. जे काराकोरम खिंडीतून लडाखला जातो. दक्षिणेला चुमार आहे, जो हिमाचल प्रदेशाशी पूर्णपणे जोडलेला आहे. हे पॅन्गॉग लेक पूर्व लडाखमधील 826 किलोमीटरच्या सीमेच्या अगदी जवळ आहे.

Related Stories

No stories found.