बांगलादेशातील नौका अपघातात 26 जणांचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 6 एप्रिल 2021

ढाकाजवळ शंभराहून अधिक प्रवासी असलेल्या एका लहान फेरी बोटीची मालवाहतूक जहाजाला धडक बसल्याने बोट पाण्यात बुडाली. आणि या नौका अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली: ढाकाजवळ शंभराहून अधिक प्रवासी असलेल्या एका लहान फेरी बोटीची मालवाहतूक जहाजाला धडक बसल्याने बोट पाण्यात बुडाली. आणि या नौका अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला. नारायणगंज जिल्ह्यातील शितालाख्या नदीत ही घटना घडली. हा अपघातानंतर तातडीने बचाव कार्याला सुरुवात झाली आणि पाण्यात पडलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. विशेष बाब म्हणजे हा अपघात झाल्यानंतर मालवाहतूक जहाज तिथून निघून गेले. अपघाताची चौकशी करण्यासाठी सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. नारायणगंज जिल्हा प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना 25 हजार टंकेची मदत जाहीर केली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नदीमध्ये सय्यदपूर कोयला घाटाजवळ प्रवासी बोट ‘एमएल सबीत अल हसन’ आणि मालवाहतूक जहाज ‘एसकेएल-3’ यांच्यात मोठी टक्कर झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टक्कर झाल्यानंतर मालवाहतूक जहाज तिथून निघून गेले. उपायुक्त मुस्तैन बिला यांनी सांगितले की, घटनेचा तपासासाठी अतिरिक्त जिल्हा मॅजिस्ट्रेटच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाचा विषाणू हा मानवाकडून प्राण्यांमध्ये संक्रमित होण्याच्या शक्यतेची पुष्टी केली आहे
 
ढाकाजवळील नौका अपघातात प्रवाशांच्या मृत्यूप्रकरणी शोकग्रस्त कुटुंबीयांबद्दल सोमवारी भारताने शोक व्यक्त केला. ही घटना रविवारी सायंकाळी नारायणगंज जिल्ह्यात घडली. जे की, राजधानी ढाकापासून दक्षिण-पूर्व दिशेला सुमारे 16 किमी अंतरावर आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी या घटनेतील प्रवाशांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

 

संबंधित बातम्या