किमान ‘तुमच्या’ पाकचे तरी ऐका : नड्डा

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा टोला लगावताना म्हणाले की, ‘कॉंग्रेसच्या शहजाद्याचा भारताचे लष्कर, सरकार व जनता या कशावरच विश्‍वास नाही.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना त्वरित सोडले नाही तर भारत हल्ला करण्याच्या तयारीत होता, या पाकिस्तानी संसदेतील  जाहीर वक्तव्यानंतर सत्तारूढ भाजपने कॉंग्रेस नेते राहुल गांधी व विरोधकांवर हल्लाबोल केला.

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा टोला लगावताना म्हणाले की, ‘कॉंग्रेसच्या शहजाद्याचा भारताचे लष्कर, सरकार व जनता या कशावरच विश्‍वास नाही. त्यांनी आता त्यांचा विश्‍वासू पाकचे म्हणणे तरी ऐकावे, तर कदाचित त्यांचे डोळे उघडतील. कॉंग्रेस सतत आपल्याच देशाच्या शूर सैनिकांचे  मनोधैय खच्ची करण्याचा प्रयत्न करते. लष्कराला आधुनिक राफेल मिळू नये यासाठी कॉंग्रेसने बदनामी मोहिमा चालविल्या.

संबंधित बातम्या