‘दहशवादाविरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन लढू’ 

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

 दहशतवाद ही संपूर्ण जगाला भेडसावणारी एक समस्या झाली आहे. संपूर्ण जगाने या समस्य़ेकडे केवळ एक देश प्रभावीत होतो आहे या नजरेतून न पाहता या समस्येवर वैश्विक सहमती तयार करणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली: दहशतवाद ही संपूर्ण जगाला भेडसावणारी एक समस्या झाली आहे. संपूर्ण जगाने या समस्य़ेकडे केवळ एक देश प्रभावीत होतो आहे या नजरेतून न पाहता या समस्येवर वैश्विक सहमती तयार करणे आवश्यक आहे. असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी इंस्टीट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीजच्या इस्त्राइल मध्ये भरलेल्या वार्षिक संमेलनात सहभागी झाले यावेळी ते म्हणाले. 'अमेरिकेत जो बायडन यांच्या नेतृत्वाखाली नवे शासन स्थापन झाले. बायडन प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचा जागतिक स्तरावर कळत नकळत परिणाम होणार. आणि संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिका घेत असणाऱ्या निर्णयांकडे आहे'' असेही ते यावेळी म्हणाले.

अमेरिकेत पुन्हा हिंसाचाराची शक्यता; सुरक्षा विभागाने दिला इशारा

दहशतवाद भारतासाठी एक मोठी समस्या आहे. शेजारी देशांकडून पुरस्कृत दहशतवादाला भारत सामोरे जात आहे. थेट कोणत्याही प्रकारचा हल्ला न करता समाजाला तसेच देशाविरुध्द युध्दाची घोषणा करण्यात येते. भारतातील मुंबईवरील हल्ला, फ्रान्समधील हल्ले हे वाढत्या हिंसक प्रवृत्तीचे निदर्शक आहेत. अमेरिका सारखी महसत्ता जागतिक स्तरावर शक्तीचे संतुलन स्वीकार करत आहे. अमेरिका सुध्दा या समस्येकडे जागतिक परिप्रेक्षातून पाहत आहे. असेही जयशंकर यांनी म्हटले. 
दरम्यान अमेरिकेसारख्या बलाढ्य देशातील होमलॅंड सिक्युरिटी विभागाने देशभरात दहशतवादी कारवायांची शक्यता असल्याचा इशारा दिला होता. अमेरिकेत नवनिर्वाचीत अध्यक्ष जो बायडन यांना विरोध दर्शवण्यासाठी देशांतर्गत सरकार विरोधी अतिरेक्यांकडून हल्ला होण्याचा हवाला त्यांनी यावेली दिला होता. भारत, अमेरिका, फ्रान्स, यांसारख्या देशात वाढत्या दहशतवादी कारवाया या देशांसाठी मोठ्या चिंतेचा विषय बनत आहेत. म्हणून संपूर्ण जगाने दहशतवादा सारख्या समस्येच्या विरोधात एकत्र येवून या लढले पाहिजे.

संबंधित बातम्या