अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सावरू

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

यंदाची अध्यक्षपदाची निवडणूक ही आपल्या प्रशासनाने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केलेले प्रयत्न विरुद्ध बायडेनप्रणीत मंदी अशी असल्याची टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

मिलवाउकी : यंदाची अध्यक्षपदाची निवडणूक ही आपल्या प्रशासनाने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केलेले प्रयत्न विरुद्ध बायडेनप्रणीत मंदी अशी असल्याची टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.  मतदान अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपले असताना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराचा वारू चौफेर उधळू लागला आहे.

थंडी आणि पावसाची तमा न बाळगता ट्रम्प यांनी मंगळवारी तीन सभा घेतल्या. मिशिगन, विस्कॉन्सिन आणि नेब्रास्का या राज्यांतील वातावरण त्यांनी ढवळून काढले. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आम्ही करांत वाढ करणार आहोत. इतिहातासील ही सर्वांत मोठी वाढ असेल, काही लोक याची खिल्ली उडवीत आहेत पण त्याला काहीही पर्याय नाही असे ट्रम्प यांनी सांगताना लॉकडाउन काढण्याच्या सरकारच्या निर्णयाचे देखील समर्थन केले. 

कोरोनापेक्षाही अमेरिकेची अंगभूत प्रेरणा ही अधिक शक्तिशाली असून, डोनाल्ड ट्रम्प हे लढवय्ये आहेत. ट्रम्प यांचे या देशावर प्रेम असून, ते दररोज लोकांसाठी संघर्ष करतात.
- मेलानिया ट्रम्प, फर्स्ट लेडी

माध्यमांवर आगपाखड
बायडेन यांचे अनेक गैरव्यवहार तंत्रज्ञान आणि माध्यम कंपन्यांनी दडपून टाकले आहेत. माध्यमांच्यादृष्टीने ही अत्यंत वाईट अशीच गोष्ट म्हणावी लागेल, अशी टीका ट्रम्प यांनी केली. वॉशिंग्टन येथे व्हाइट हाउसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ओबामांची प्रचारमोहीम दाखविल्याबद्दल फॉक्स न्यूजविरोधात नाराजी व्यक्त केली.

संबंधित बातम्या