ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये लिलि सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा      

दैनिक गोमन्तक
सोमवार, 15 मार्च 2021

ग्रॅमी अवॉर्ड्स 2021 मध्ये यूट्यूब सेन्सेशन आणि टॉक शो होस्ट लिलि सिंह यांनी भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भातील मास्क चेहऱ्यावर परिधान करून आंदोलनालनाला समर्थन दिले आहे.

ग्रॅमी अवॉर्ड्स 2021 मध्ये यूट्यूब सेन्सेशन आणि टॉक शो होस्ट लिलि सिंह यांनी भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भातील मास्क चेहऱ्यावर परिधान करून आंदोलनालनाला समर्थन दिले आहे. केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागील तीन महिन्यांच्या पेक्षा अधिक काळापासून  दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन करत आहेत. आणि आंदोलन करत असलेल्या या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरलेल्या लिलि सिंह यांनी नुकतेच पार पडलेल्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2021 चे फोटो आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. ज्या मध्ये लिलि सिंह यांनी 'मी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे,' असे लिहिलेला मास्क घातल्याचे दिसत आहे. 

National Consumer Rights Day 2021: राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व काय?

केंद्र सरकारने कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करताना नवीन कृषी धोरण लागू केले. आणि या विधेयकातील तीन कायद्यांना शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. यानंतर देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सेलिब्रेटींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता यूट्यूब सेन्सेशन आणि टॉक शो होस्ट लिलि सिंह यांनी देखील देशातील शेतकऱ्यांच्या आंदोलन प्रश्नात उडी घेतली आहे. लिलि सिंह यांनी ग्रॅमी अवॉर्ड्स मध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविणारा मास्क घातला. आणि या संदर्भातील आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोला कॅप्शन देताना लिलि सिंह यांनी "मला माहित आहे रेड कार्पेट किंवा अवॉर्ड शो मधील फोटोंना नेहमीच सर्वाधिक कव्हरेज मिळतात, म्हणून आपण मीडियासाठी फोटो शेअर करत आहे. याचा खुलेपणाने वापर करा,'' असे म्हटले आहे. याशिवाय, लिली सिंह यांनी अपलोड केलेल्या या पोस्टला आय स्टॅन्ड विथ फार्मर्स आणि ग्रॅमी असा हॅशटॅग दिला आहे.       

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lilly Singh (@lilly)

दरम्यान, यापूर्वी अमेरिकन पॉप स्टार रिहाना हिने देखील सोशल मीडियावरील ट्विटरवर ट्विट करत भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तिच्या व्यतिरिक्त ट्रेव्होर नोह, जय सीन, अमांडा सेर्नी आणि ग्रेटा थनबर्ग यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित व्यक्तींनी शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ पुढे येत पाठिंबा दर्शविला होता. तर देशातील प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, दलजीत दोसांझ यांच्यासह इतरही अनेक सेलिब्रेटींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य करताना समर्थन दिले होते. 

संबंधित बातम्या