जर्मनीत पुन्हा लॉकडाऊन; पाच दिवसातून एकदाच उघडली जाणार दुकाने

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

मर्केल यांनी देशामधील वेगवेगळ्या प्रांतातील 16 नेत्यांसोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली आहे.

बर्लिन: (Lockdown again in Germany Shops will be opened once in five days) कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खबरदारीचा इशारा म्हणून लॉकडाउन आणि इतर निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. आधीपेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने वाढू लागल्यामुळे भिती व्य़क्त केली जात आहे. त्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रान्स पाठोपाठ जर्मनीने याच पध्दतीचा निर्णय घेत पाच दिवसांचे कठोर निर्बंध असणाऱ्या लॉकडाऊनची घोषणा केल्याचं एएफपी वृत्तसंस्थेने सांगितले आहे. जर्मनीच्या चान्सलर अ‍ॅंजेला मार्केल यांनी मंगळवारी स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर या लॉकडाऊनच्या संदर्भातील निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने इस्टर सण्डेच्या आसपास पाच दिवस देशामध्ये कठोर निर्बंध लागू असणारा लॉकडाऊन लागू करण्याचा मर्केल यांनी निर्णय घेतला आहे.

अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस 100 टक्के प्रभावी; अमेरिकेतील तिसऱ्या टप्प्याचे निष्कर्ष...

मर्केल यांनी देशामधील वेगवेगळ्या प्रांतातील 16 नेत्यांसोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान देशामध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या संदर्भात सहमती दर्शवली आहे. याच बैठकीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि मोठ्या खेळांच्या आयोजनावरही 18 एप्रिलपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आला आहे. पाच दिवसांच्या या लॉकडाऊन दरम्यान देशातील दुकाने, मॉल्स बंद ठेवण्यात येणार आहेत. ईस्टरच्या प्रार्थनासभाही ऑनलाइन माध्यमातून आयोजित करण्यासंदर्भात आदेश आणि सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच भाजी आणि अन्नधान्यांची दुकाने तीन एप्रिलच्या एका दिवसासाठी उघडण्याची परवानगी देण्य़ात आली आहे. (Lockdown again in Germany Shops will be opened once in five days)

देशातील वेगवेगळ्या प्रांतातील 16 प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मर्केल यांनी, ‘’देशातील परिस्थीती खूप गंभीर आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आयसीयू बेड्स पुन्हा एकदा भरु लागले आहेत. 16 नेत्यांच्या बैठकीनंतर आम्ही ईस्टरदरम्यान शाळांना सुट्टी जाहीर करत आहोत. काहींना लॉकडाऊनच्या काळात सूट देऊन काहींवर निर्बंध लागू करणे योग्य नसल्याचे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केल्यानंतर सर्वांवर कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असं सांगितले आहे.

कोरोना कालावधीमध्ये युरोपीयन देशांपैकी सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वात मोठी आर्थिक मदत करणाऱ्या देशांमध्ये जर्मनीचा समावेश आहे. अनेक वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जर्मनीने नागरिकांना कोरोना कालावधीत आर्थिक मदत केली होती. तसेच फेब्रवारी महिन्यामध्ये शाळा सुरु करण्याची परवानगीसुध्या देण्यात आली .  
 

संबंधित बातम्या