ज्यांना कोरोनाची लस मिळत नाही त्यांच्यासाठी 'या' देशात लॉकडाऊन!

कोरोनावर (Coronavirus) मात करण्यासाठी आणि त्यापासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.
ज्यांना कोरोनाची लस मिळत नाही त्यांच्यासाठी 'या' देशात लॉकडाऊन!
Corona VaccinationDainik Gomantak

कोरोनावर (Coronavirus) मात करण्यासाठी आणि त्यापासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. लहान-मोठे सर्व देश आपल्या नागरिकांना कोरोनाची लस घेण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. दरम्यान, युरोपीय देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. काही देशांमध्ये, ज्यांना लस मिळाली आहे त्यांच्या बाबतीतही हे घडत आहे. परंतु ज्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही, ते सरकारसाठी अडचणीचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रियाने (Austria) या लोकांसाठी कठोर पावले उचलली आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रियाने जाहीर केले आहे की, ज्यांनी कोरोनाची लस घेतलेली नाही त्यांच्यासाठी लॉकडाऊन लागू केले जात आहे. अशा लोकांवर अनेक प्रकारची बंधने घालण्यात आली आहेत. ज्या लोकांना ऑस्ट्रियामध्ये लस मिळालेली नाही, ते आता घरीच राहतील. त्यांना ना रेस्टॉरंटमध्ये जाता येणार आहे ना कोणत्याही हॉटेलमध्ये जाण्याचे स्वातंत्र्य असणार. त्याचबरोबर लस घेतलेल्यांसाठी अनेक सुविधा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Corona Vaccination
जपानमध्ये बुस्टर डोस देण्याची तयारी सुरू

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या लोकांना लस मिळत नाही ते फक्त डॉक्टरांना भेटण्यासाठी आणि आवश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर जाऊ शकतील. ज्या लोकांना नुकताच कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि ते अद्याप बरे झालेले नाहीत, त्यांनाही घरीच राहावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व लॉकडाऊनच्या नियमांतर्गत येईल.

ऑस्ट्रियाचे कुलपती अलेक्झांडर शॅलेनबर्ग (Alexander Schellenberg) यांनी ही घोषणा केली. सोमवारपासून ऑस्ट्रियामध्ये लस न घेणाऱ्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. ऑस्ट्रियामध्ये, लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

तसेच, ऑस्ट्रियामध्ये कोरोना लसीकरणाचा वेग चांगला आहे. परंतु काही लोक अजूनही लस घेण्यास लोक टाळाटाळ करतात. आतापर्यंत देशातील 65 टक्के लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत 11700 लोकांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com