Lockdown in India advises US health advisers
Lockdown in India advises US health advisers

''भारतात लॉकडाऊन करा'' अमेरिकेच्या आरोग्य सल्लागारांचा सल्ला

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा सल्ला अमेरिकेच्या प्रशासनातील मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अ‍ॅंथनी एस फौसी (Anthony Fauci) यांनी दिला आहे. फौसी बायडन प्रशासनातील मुख्य आरोग्य सल्लागार आहेत. त्यांना अमेरिकेतील सात राष्ट्रध्याक्षांबरोबर काम करण्याचा अनुभव आहे. (Lockdown in India advises US health advisers)

''भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, बेड्स उपलब्ध होत नाहीत. त्याचबरोबर औषधांचा काळाबाजार सुरु आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसोबत सामान्य जनताही अडचणीत आहे. कोरोनाच्या विस्फोटामुळे देशातील परिस्थिती यावेळी कठीण झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्य़ाची गरज आहे. तरच कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल,'' असं मत डॉ. फौसी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे.

त्याचबरोबर, ''देशातील लसीकरण मोहीम आणखी वेगाने वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे कोरोनाला रोख लावता येणार आहे. भारतात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आरोग्य़ कमीशन गठीत करण्याची गरज आहे. त्यामुळे ऑक्सिजन, औषधांचा पुरवठा करणं आणखी सोपं होणार आहे,’’ असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे.

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अवघ्या तीन महिन्यातचं अतिशय भयावह परिस्थितीमध्ये ढकललं आहे. दररोज लाखो लोक कोरोनाचा शिकार होत असून अनेक कुटुंबं उघड्यावर येत आली आहेत. कोरोनाच्या भयावह परिस्थितीमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडा वेगाने वाढला असून फक्त एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवसांतच देशात 45,000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्याचं मोठं आव्हान आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com