लगन लगी...! आजीबाईंनी नातवाच्या वयाच्या तरुणासोबत उडवला लग्नाचा बार
Quran McCain & Cheryl McGregorDainik Gomantak

लगन लगी...! आजीबाईंनी नातवाच्या वयाच्या तरुणासोबत उडवला लग्नाचा बार

61 वर्षीय चेरिल मॅकग्रेगर (Cheryl McGregor) आणि तिचा 24 वर्षीय पती कुराण मॅककेन (Quran McCain) यांच्या लग्नाची फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

प्रेमात असलेले लोक एकमेकांशिवाय काहीच पाहत नाहीत. हे प्रेमीयुगुल आपल्याच दुनियेत मस्त असते. त्यांना संपूर्ण जग काहीसं ठेंगणं वाटू लागतं. मग प्रेमामध्ये ना वयाचे अंतर अडथळा बनते ना जातीपातीचे. 61 वर्षीय चेरिल मॅकग्रेगर (Cheryl McGregor) आणि तिचा 24 वर्षीय पती कुराण मॅककेन (Quran McCain) यांच्या लग्नाची फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 3 सप्टेंबर रोजी दोघांनी थेट समाजाने घालून दिलेल्या परंपरेला न जुमानता लग्न केले. त्यांच्या या लग्नामुळे बरीच चर्चा झाली. बरं, ती चर्चा कगा होऊ नये? समाजाने घालून दिलेले संकेत त्यांनी लग्न करुन धुडकावून दिले. येणाऱ्या काळात असही काही होऊ शकते याची प्रचिती आणून दिली. दोघांच्या वयात 37 वर्षांचे अंतर आहे. अमेरिकेत (America) राहणाऱ्या या जोडप्याची प्रेमकथाही त्यांच्या लग्नाप्रमाणेच अनोखी आहे.

तसेच, प्रेमात बुडलेल्या या जोडप्यातील प्रणय गेल्या वर्षी सुरु झाला. हे युगुल 2012 पासून एकमेकांना ओळखत आहे. त्यांच्या पहिल्या भेटीच्या वेळी, कुराण 15 वर्षांचा होता. ते त्यावेळी चेरिलच्या मुलाच्या रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. पण दोघांमधील प्रेमाची बीजे गेल्या वर्षी रुजली गेली. जेव्हा दोघांनी त्यांचे नाते सार्वजिनक केले, तेव्हा मात्र त्यांना समाजामधून होत असलेल्या चांगलाच सामना करावा लागला. मात्र त्या दोघांनीही त्यांच्यावर असलेल्या टीकेला जुमानता कायदेशीर पती -पत्नी झाले आहेत.

Quran McCain & Cheryl McGregor
अमर व्हायचंय म्हणून ‘या’ कोट्याधीशाने केली मोठी गुंतवणूक!

1 लाख लोकांनी लग्न पाहिले

विशेष म्हणजे कुरान आणि चेरिल यांनी त्यांच्या लग्नाचे थेट प्रक्षेपण केले होते. ते सुमारे एक लाख लोकांनी पाहिले. दोघांचे जवळचे मित्र यावेळी लग्नाला उपस्थित होते. यानंतर ते दोघे थेट हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर एक व्हिडिओ बनवून लोकांसोबत शेअर केला. लग्नानंतर कुराणने सांगितले की, आम्ही लग्नानंतर एकमेकांसाठी काही वेळा दिला. त्यानंतर दोघेही आपल्या घराकडे रवाना झाले.

अशी आहे लवस्टोरी

या जोडप्याची लवस्टोरीही खूपच अनोखी आहे. 2012 मध्ये दोघांची पहिली भेट झाली. त्या काळात कोणालाही वाटले नव्हते की, त्यांचे एकमेकांवर प्रेम होईल. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेम फुलले. चेरिल आधी टिकटॉकवर व्हिडिओ बनवत असे. जेव्हा अशाच एका व्हिडिओवर नकारात्मक टिप्पणी आल्यानंतर चेरिल फार दुखावली गेली, आणि तेव्हाच या दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर फुलले. यानंतर, 17 नातवंडांच्या आजी चेरिलच्या प्रेमात पडली.

Quran McCain & Cheryl McGregor
ब्रिटीश कमिश्नर भारतीय खाद्यसंस्कृतीच्या प्रेमात

असं केलं प्रपोज

वर्षभराच्या अफेअरनंतर कुरानने चेरिलला लग्नासाठी प्रपोज केले. गेल्या वर्षीच दोघांनी आपले नाते सार्वजनिक केले. कुरानने चेरिलला दोन लाख 20 हजारांची अंगठी देऊन प्रपोज केले. हा अनुभव सांगताना कुराणने सांगितले की, आधी तो खूप चिंताग्रस्त होता. पण चेरिलला पाहताच तो स्तब्ध झाला. या प्रपोजनंतर चेरिललाही आश्चर्य वाटले. आता दोघेही विवाहित असून खूप आनंदी आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com