अमेरिकेच्या इमीग्रेशन पॉलिसीमध्ये मोठा बदल; पदभार स्वीकारताच बायडन यांचा निर्णय

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

अमेरिकेच्या इमीग्रेशन पॉलिसीत (स्थलांतर धोरणात) बदल करण्यास सुरुवात झाली  यामुळे  भारतीयांना  दिलासा  मिळणार  आहे.

वाशिंग्टन: अमेरिकेच्या  राष्ट्राध्यक्ष  पदाची  धुरा  हाती  घेतल्यानंतर  जो बायडन यांनी मोठ्या निर्णयांच्या घोषणा करण्यास सुरुवात केली  आहे. अमेरिकेच्या इमीग्रेशन पॉलिसीत (स्थलांतर धोरणात) बदल करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे  भारतीयांना  दिलासा  मिळणार  आहे.

बायडन यांनी अमेरिकन कॉंग्रेससमोर बोलताना  म्हटले, ''एक  नवीन कायदा  तयार  करण्यात  येणार आहे. या  कायद्यामुळे  1 कोटी 10  लाख अप्रवासी असणाऱ्या  नागरिकांना येणाऱ्या   काळात  अमेरिकेत  स्थायिक  होण्याचा  अधिकार  मिळणार  आहे''. यामुळे  अमेरिकेचे  नागरिकत्व  मिळवण्याचे  अडथळे  कायमस्वरुपी  दूर  होणार  आहेत. यामध्ये लाखो भारतीयांचा      समावेश आहे.

मावळते  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  स्थलांतर  धोरणासंबंधी  घेतलेल्या निर्णायामुळे अनेक  नागरिकांवर  देश  सोडून  जाण्याची  टांगती  तलवार  होती.  मात्र  बायडन  यांनी  घेतलेल्या निर्णयामुळे ट्रम्प यांचे  अनेक निर्णय रद्द करण्यात आल्याने अप्रवासी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बायडन  यांच्या  या  निर्णयाचे  स्वागत  करण्यात येत आहे.

आता अनेक भारतीयांचे  अमेरिकेत स्थायीक  होण्याचे  स्वप्न  पूर्ण होणार आहे.  बायडन यांनी जारी केलेल्या आदेशामुळे आता अमेरिकेत विना कागदपत्रे राहत असणाऱ्या नागरिकांनाही याचा  फायदा  होणार  आहे.

यापूर्वी  ट्रम्प  यांनी  इमिग्रेशन पॉलीसीमध्ये अप्रवासी नागरिकांना वास्तव्य करायचा परवाना हा गुणवत्तेवर अवलंबून  असल्यास त्याला नागरिकत्व देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला  होता. मात्र आता  यामध्ये  बदल करत  वास्तव्याचा  परवाना  जे  लोक  अमेरिकेत राहून अमेरिकन नागरी कर्तव्ये पार पाडत असतील त्यांना अस्थायी पध्दतीने अमेरिकेत राहण्याची परवानगी  देण्यात येणार  किंवा थेट ग्रीन कार्ड  देण्यात येणार आहे. 

संबंधित बातम्या