चीन सरकारचा मोठा निर्णय; आता 'हम दो हमारे तीन'

चीन सरकारचा मोठा निर्णय; आता 'हम दो हमारे तीन'
china 5.jpg

लोकसंख्येचा(population) थेट प्रभाव अर्थकारणावर पडत असतो. यामुळे लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचं अर्थतज्ञांकडून सुचवलं  जातं. काही वर्षापासून चीनने (China) लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक नियम लागू केले होते. चीनी सरकारने 'टू चाइल्ड पॉलिसी' (Two child policy) 'अंतर्गत दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी दिली होती. मात्र देशातील अर्ध्याहून अधिक नागरिक वयोवृध्द असल्याने चीनच्या चिंतेत अधिकच वाढ झाली होती. त्यामुळे चीनी सरकारने हा नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. आता चीनी दाम्पत्य तीन मुलांना जन्म देऊ शकतात.

चीनमध्ये गेल्या काही वर्षामध्ये जन्मदर घटला आहे. तसेच वयोवृध्द नागरिकांची संख्याही वाढत असल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. वाढत्या वयोवृध्द लोकसंख्येमुळे भविष्यात परिणाम जाणवतील, या भीतीने चीनच्या सरकारने निर्णय घेतला आहे. नव्या लोकसंख्या धोरणाला चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (President Xi Jinping) यांच्याकडून मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे 'टू चाइल्ड पॉलिसी' चीनमधून संपुष्टात येणार आहे. (A major decision by the Chinese government Comes we two our three)

2010 ते 2020 या कालावधीत चीनमध्ये लोकसंख्या वाढीचा वेग 0.53 टक्के इतका होता. चीनमधील लोकसंख्येत मागील दोन दशकात कमालीची घट झाली आहे. 2020 या वर्षामध्ये फक्त 12 दशलक्ष मुलांचा जन्म झाला आहे. तर 2018 मध्ये 18 दशलक्ष मुलांचा जन्म झाला आहे. मात्र अस असले तरी जागतिक लोकसंख्येच्या यादीमध्ये चीन आताही अव्वल आहे. चीन खालोखाल भारत आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. वर्ल्डोमीटर या वेबसाईटने ही माहिती दिली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com