''...यामुळे भारतातील कोरोनाची परिस्थिती इतकी वाईट !’’ डॉ. फौचींनी सांगितलं कारण!

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

कोरोनाच्या परिस्थितीविषयी भारताचा अंदाज पूर्णपणे चुकल्याचं फौची यांनी सांगितलं.

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. भारतात गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कोरोना मृतांचे आकडे देखील वेगाने वाढत असताना देशात अनेक भागांमध्ये ऑक्सिजन (Oxygen), व्हेंटीलेटर्स, रेमडिसिव्हीर (Remdesivir) आणि लसींची कमतरात जाणवू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत सामान्य परिस्थिती असणाऱ्या भारतामध्ये अचानक कोरोनानं इतकं भीषण रुप कसं धारण केलं? आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा भारताला कसा बसला? यावर जगभरात चर्चा सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अ‍ॅंथनी  फौची (Anthony Fauci) यांनी भारतात कोरोनाची इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाल्याचं कारण स्पष्ट केलं आहे. तसेच, भारतात निर्माण झालेल्या भयंकर परिस्थितीमधून अमेरिका आणि जगाला तीन गोष्टी शिकायला मिळाल्याचं देखील त्यांनी सांगितलं.  (This makes Coronas situation in India so bad Fauchi said because)

China: झिनजियांगमधील लोकसंख्या 48 टक्यांनी घटली; उइगर मुस्लिमांवर अत्याचारात...

कोरोनाच्या परिस्थितीविषयी भारताचा अंदाज पूर्णपणे चुकल्याचं फौची यांनी सांगितलं. भारत आज कोरोनाच्या इतक्या भयंकर परिस्थीतीमध्ये सापडला याचा कारण म्हणजे भारतानं चुकीचा अंदाज बांधला आणि योग्य वेळेच्या पूर्वीच सर्व व्यवहार सुरु केले,’’ असं फौची म्हणाले आहेत. भारताला वाटलं की देशातील कोरोनाची लाट ओसरली आहे. त्यामुळे त्यांनी खूप लवकर सर्व गोष्टी सुरु करायला सुरुवात केली. त्यामुळे सध्या भारतात वेगाने फैलावत असलेल्या कोरोनाचं भीषण रुप आपल्या सगळ्यांना दिसत आहे,’’ असं ते म्हणाले.

दरम्यान यावेळी फौची यांनी, ‘’भारतात (India) निर्माण झालेल्या कोरोनाच्या भयंकर परिस्थीतून अमेरिका आणि जगाला तीन गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. भारतातल्या परिस्थीतून एक गोष्ट समोर आली ती म्हणजे कोणत्याही परिस्थीला कमी लेखू नये. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील. भविष्यात उद्भवणाऱ्या महामारींसाठी देखील आपण सार्वजनिक आरोग्याबाबत तयार राहणं हे आपण शिकलो. गेल्या दशकभरापासून आपण त्यावर वेगवेगळ्या माध्यमातून काम करतच होतो ही मात्र जमेची बाजू!’’

 

संबंधित बातम्या