Cyclone Freddy: फ्रेडी चक्रीवादळाचा कहर, मलावीत मृतांची संख्या 438 वर पोहोचली!

Cyclone Freddy: आफ्रिकेत निसर्गाने कहर केला आहे. दोन कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या मलावीला हवामानाचा मोठा फटका बसला आहे.
Cyclone Freddy
Cyclone FreddyDainik Gomantak

Cyclone Freddy: आफ्रिकेत निसर्गाने कहर केला आहे. दोन कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या मलावीला हवामानाचा मोठा फटका बसला आहे.

फ्रेडी (Freddy) वादळाने या देशात कहर केला आहे. यामुळे येथे मृतांची संख्या आता 438 वर पोहोचली आहे, असे देशाच्या आपत्ती व्यवस्थापन व्यवहार विभागाने सांगितले.

तर 282 जण बेपत्ता असल्याची माहिती शिन्हुआ या वृत्तसंस्थेने आपत्ती व्यवस्थापन व्यवहार विभागाचे आयुक्त चार्ल्स कालेम्बा यांच्या वतीने दिली आहे.

वादळाचा सर्वाधिक प्रभाव ब्लांटायर शहराजवळ नोंदवला गेला आहे. त्याचबरोबर जखमींची एकत्रित संख्या 918 वर पोहोचली आहे.

दरम्यान, सुमारे 3,45,183 लोक विस्थापित झाले आहेत आणि त्यांना सामावून घेण्यासाठी 505 छावण्या उभारण्यात आल्या आहेत.

आयुक्तांनी सांगितले की, त्यांचा विभाग, मलावी संरक्षण दल, मलावी पोलीस सेवा, सागरी विभाग, मलावी रेड यांच्या नेतृत्वाखालील शोध आणि बचाव कार्यांसह प्रभावित आणि विस्थापित कुटुंबांना मदत सहाय्य पुरवत आहेत.

Cyclone Freddy
Cyclone Freddy: मलावीमध्ये फ्रेडी चक्रीवादळाचा तांडव, 300 हून अधिक जणांचा मृत्यू

जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार, हे वादळ दक्षिण गोलार्धात आतापर्यंत आलेल्या सर्व वादळांपेक्षा अधिक घातक असू शकते.

मोझांबिकलाही या वादळाचा फटका सहन करावा लागला आहे. फ्रेडीचे वादळ इतके धोकादायक होते की, मोझांबिकमधील अनेक इमारती त्याच्या कचाट्यात येऊन कोसळल्या. यासोबतच अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले आहे.

कॉलराचा उद्रेक

मलावीतील क्वेलमेन बंदराजवळ पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी, मलावी इतिहासातील सर्वात घातक कॉलराच्या उद्रेकाशी देखील लढत आहे.

अशा परिस्थितीत, संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) एजन्सींनी जारी केलेल्या इशाऱ्यांनुसार, मलावीमध्ये अतिवृष्टीमुळे कॉलराची स्थिती आणखी बिघडू शकते.

Cyclone Freddy
US Bomb Cyclone: 'बॉम्ब'मुळे जगातील सर्वाधिक शक्तिशाली देश पडला ठप्प; न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी...

दुसरीकडे, चक्रीवादळामुळे (Cyclone) बाधित रहिवाशांना मदत करण्यासाठी स्थानिक व्यवसायिकांनी $1.5 दशलक्ष उभे करण्याचे वचन दिले आहे. जागतिक हवामान संघटनेच्या मते, फ्रेडी हे सर्वात घातक चक्रीवादळ आहे आणि त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहू शकतो.

मोझांबिक आणि मलावीमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. प्रभावित भागातील काही भागात वीजपुरवठा आणि फोनचे सिग्नल खंडित झाल्याने मृतांची संख्या वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com