मलेशियाच्या नव्या पंतप्रधानांची राजकीय स्थिरतेसाठी ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी

पंतप्रधान इस्माईल साबरी याकोब (Ismail Sabri Yaakob) यांनी सोमवारी अनवर इब्राहिम यांच्या नेतृत्वाखालील मुख्य विरोधी गटासोबत अभूतपूर्व सहकार्य करारावर स्वाक्षरी केली.
मलेशियाच्या नव्या पंतप्रधानांची राजकीय स्थिरतेसाठी ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी
Ismail Sabri YaakobDainik Gomantak

सत्तेवर येताच एका महिन्याच्या आत मलेशियाच्या (Malaysia) नव्या पंतप्रधानांनी अनेक सुधारणांविषयी आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याच्या जोरावर विरोधी पक्षातील नेत्यांची मनेही जिंकली आहेत. त्याचबरोबर आपल्या कमजोर सरकारला स्थिर करण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळविण्यात यश आले आहे. दरम्यान, सोमवारी देशाच्या संसदेचे अधिवेशन सुरु झाले. पंतप्रधान इस्माईल साबरी याकोब (Ismail Sabri Yaakob) यांनी सोमवारी अनवर इब्राहिम यांच्या नेतृत्वाखालील मुख्य विरोधी गटासोबत अभूतपूर्व सहकार्य करारावर स्वाक्षरी केली.

याकूब यांनी हा करार दोन वर्षांत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी त्यांच्या राजवटीला कमजोर करण्याचा प्रयत्न टाळण्यासाठी केला आहे. 'राजकीय स्थिरता आणि बदल' कराराअंतर्गत, इस्माईल यांना 222 सदस्यीय सभागृह (Cooperation Agreement Malaysia) मध्ये 114 खासदारांव्यतिरिक्त अन्वर यांच्या गटातील 88 खासदारांचा पाठिंबा मिळेल असेल असं म्हटलं आहे. इस्माईल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, करारामुळे द्विपक्षीय सहकार्य आणि राजकीय सुधारणा होतील ज्यामुळे शासन मजबूत होईल.

Ismail Sabri Yaakob
भारत काश्मीरमधील लोकांवर अन्याय करतोय; पाकिस्तानी राष्ट्रपतींचा आरोप

एमओयू विकासासाठी उपयुक्त ठरेल

इस्माईल पुढे म्हणाले, "सरकारला विश्वास आहे की, हा सामंजस्य करार केवळ सर्व राजकीय मतभेद दूर करण्यात मदत करणार नाही, तर देशाचा सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासासाठी होईल याची खात्री आम्हाला आहे." ते पुढे म्हणाले की, आम्ही शासन आणि संसदीय सुधारणांना मजबूत करण्यावर भर देत आहोत. (Malaysia Politics Crisis). हे लक्षात घेण्यासारखे आहे की, इस्माईल यांनी गेल्या आठवड्यात पक्षीय विघटन रोखण्यासाठी नवीन कायदे बनवले त्याचबरोबर पंतप्रधानांचा कार्यकाळ 10 वर्षांवर मर्यादित करण्यासह अनेक सुधारणा केल्या होत्या.

Ismail Sabri Yaakob
अमेरिकेत कायमस्वरुपी राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, भारतीयांनाही फायदा...

पंतप्रधानांसमोर कोणती आव्हाने आहेत?

पंतप्रधान इस्माईल सबरी याकूब यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान म्हणजे ध्रुवीकृत समाजाला एकत्र करणे आणि कोरोनामुळे बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे आहे. माजी पंतप्रधान मुहिद्दीन यासिन यांच्या कार्यकाळात याकूब उपपंतप्रधान होते. युतीमधील भांडणामुळे बहुमत गमावल्यानंतर यासीन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता, ते 18 महिन्यांपेक्षा कमी काळ ते पंतप्रधान पदावर राहिले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com