Mali: सालेहमध्ये माली लष्करांची मोठी कारवाई, 203 दहशतवाद्यांचा केला खात्मा

आफ्रिकन देश असणाऱ्या मालीमध्ये (Mali) माली लष्कराने मोठी लष्करी कारवाई केली आहे.
Terrorists
TerroristsDainik Gomantak

आफ्रिकन देश (African Countries) असणाऱ्या मालीमध्ये लष्कराने मोठी लष्करी कारवाई केली आहे. ज्यामध्ये 203 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे लष्कराने म्हटले आहे. देशाच्या (Mali) मध्यभागी असलेल्या सालेह राज्यात ही कारवाई करण्यात आली आहे. मालीमध्ये हिंसाचाराच्या घटना सातत्याने वाढू लागल्या आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा करण्यासाठी लष्कर अशी पावले उचलत आहे. शुक्रवारी माहिती देताना लष्कराने सांगितले की, ''सालेहच्या (Saleh) मौरा भागात 23 मार्च रोजी नऊ दिवस चाललेले लष्करी ऑपरेशन सुरू झाले. जिथे मोठ्या प्रमाणात दहशतवादी सक्रिय आहेत.'' (Mali's army killed 203 militants in Saleh the military operation lasted 9 days)

दरम्यान, लष्कराने अशा वेळी दहशतवाद्यांना ठार मारल्याची घोषणा केली आहे, जेव्हा मालीच्या सर्व सोशल मीडिया रिपोर्ट्समध्ये मौरामध्ये माली नागरिक मारले गेल्याचे म्हटले जात आहे. परंतु लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ''सैनिकांनी 203 दहशतवाद्यांना ठार केले आहे. तर दुसरीकडे 51 जणांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. तथापि, सोशल मीडिया अहवालातून मृतांच्या आकडेवारीची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकलेली नाही.''

Terrorists
Russia-Ukraine war : युक्रेनमधील युद्धात किमान 1,276 नागरिक ठार, 1,981 जखमी

2012 मध्ये जिहादी बंडखोरी झाली

मालीबद्दल बोलायचे झाले तर, सुमारे 21 दशलक्ष लोकसंख्या असलेला हा गरीब देश आहे. माली 2012 मध्ये उद्रेक झालेल्या जिहादी बंडखोरीला रोखण्यासाठी लढा देत आहे. परंतु दुर्देवाने शेजारच्या बुर्किना फासो आणि नायजरमध्ये या बंडखोरांनी आपले कार्यक्षेत्र विस्तारले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com