मल्लिका शेरावतने ११ वर्षांपूर्वी केलेलं ट्विट होतंय चांगलंच व्हायरल...

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

मल्लिका शेरावतने ११ वर्षांपूर्वी एक ट्विट केलं होतं. यात कमला हॅरिस यांच्या राजकीय कारकीर्दीविषयी तिने भाष्य केलं होतं. तिचं हे भाष्य चांगलंच खरं ठरल्याचं सर्वत्र बोललं जात आहे.

अमेरिकेत अध्यक्षीय पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देत जो बायडेन यांनी विजय मिळवला. व्हाईट हाऊसमध्ये काम करण्यासाठी त्यांच्याबरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरिस याही निवडून आल्या. कमला यांच्या विजयाच्या बातमीनंतर अभिनेत्री मल्लिका शेरावतने ११ वर्षांपूर्वी एक ट्विट चांगलंच व्हायरल होत आहे. यावर चर्चा करताना नेटकरी मल्लिकाचं कौतूक करताना तिची भविष्यवाणी खरी ठरल्याच्या गप्पा करत आहेत.  

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भारतातही आनंद साजरा करण्यात येत आहे. प्रदीर्घ काळापासून राजकारणात सक्रिय असलेल्या कमला हॅरिस यांना डेमॉक्रटिक पक्षात अत्यंत महत्वाचं स्थान आहे. यामुळेच त्यांची अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठी वर्णी लागली आहे. 

दरम्यान, मल्लिका शेरावतने ११ वर्षांपूर्वी एक ट्विट केलं होतं. यात कमला हॅरिस यांच्या राजकीय कारकीर्दीविषयी तिने भाष्य केलं होतं. तिचं हे भाष्य चांगलंच खरं ठरल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. मल्लिकाने २००९मध्ये ट्विट करताना म्हटलं होतं की, 'मी एका पार्टीमध्ये जिथे धमाल करत आहे, त्याठिकाणी एक महिला बसली आहे. ज्यांच्याविषयी बोलताना चर्चा होत आहे की, त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात.' 

तिची ही आशा खरी ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कमला हॅरिस जरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष नाही झाल्या. तरीही त्या आता उपराष्ट्राध्यक्ष झाल्या आहेत. त्यामुळे मल्लिकाची ११ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी काहीअंशी का होईना खऱी ठरली आहे. 

संबंधित बातम्या