Viral Video: जिवंत सापाला चिकन तंदुरीसारखं भाजतोय हा व्यक्ती, हृदय पिळवटून टाकणारा Video!

Snake Viral Video: अलीकडच्या काळात सोशल मीडियावर अनेक चकित करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात.
Snake Viral Video
Snake Viral VideoDainik Gomantak

Snake Viral Video: अलीकडच्या काळात सोशल मीडियावर अनेक चकित करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे, ज्याने सर्वांचेच होश उडवले आहेत. ज्यामध्ये एक व्यक्ती एका घातक विषारी सापाला हाताने पकडून आगीवर शिजवताना दिसत आहे. जे पाहून सोशल मीडिया युजर्संची चांगलीच भांबेरी उडाली आहे.

दरम्यान, साप दिसला की आपली भांबेरी उडते. कारण कोणत्याही व्यक्तीला मारण्यासाठी सापाचे विष पुरेसे असते. दुसरीकडे, आपण अनेकदा सर्पमित्रांना सापांना वाचवताना पाहिले असेल. त्याचवेळी काही लोक त्याला पाहताच पकडून खातात. असाच काहीसा प्रकार व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

Snake Viral Video
Shocking: फ्लाइटमध्ये एअर होस्टेसवर प्रवाशाने केला हल्ला! व्हायरल व्हिडिओवरुन गोंधळ

व्यक्तीने साप शिजवताना पाहिले

सोशल मीडियावर (Social Media) सर्वांचे लक्ष वेधून घेणारा हा व्हिडिओ नरेंद्र सिंग नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती आश्चर्यकारक पद्धतीने जिवंत साप हातात धरुन समोरच्या बाजूला शिजवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने सापाला आगीजवळ आणताच आगीपासून वाचण्यासाठी सापाचे शरीर थरथरु लागते.

Snake Viral Video
Shocking: बायकोनेच नवऱ्यावर केला वाइफ स्वॅपिंगचा आरोप, 'रोज मला...'

आगीमुळे साप मरण पावला

व्हिडिओमध्ये तो व्यक्ती आगीच्या ज्वालावर सापाला शिजवताना दिसत आहे. त्यामुळे शेवटी साप मरतो. सध्या हा व्हिडिओ पाहून युजर्स अचंबित झाले आहेत. त्याच वेळी, काही यूजर्संनी याला खूपच विचित्र म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात शेअर होत आहे. त्याचबरोबर व्हिडिओवर यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com