E-Mail द्वारे शॉक! फॅमिली ट्रिपमधून 'तो' अचानक झाला गायब; ISIS मध्ये सापडला

Shabazz Suleman: ग्रामर स्कूलमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने जे केले, त्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. तो असे पाऊल उचलेल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती.
Youth
YouthDainik Gomantak

Islamic State: ग्रामर स्कूलमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने जे केले, त्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. तो असे पाऊल उचलेल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. 27 वर्षीय शाबाज सुलेमान (Shabazz Suleman) असे या मुलाचे नाव आहे.

तो आपल्या कुटुंबासह लंडनहून तुर्कस्तानला सुट्टीसाठी गेला होता. त्यानंतर तो अचानक गायब झाला. आता शाबाजला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) मध्ये सामील होण्यासह अनेक प्रकरणांमध्ये तो दोषी आढळला आहे.

दरम्यान, सुलेमान 2014 मध्ये कुटुंबासह सुट्टीवर असताना अचानक गायब झाला होता. त्यानंतर त्याने त्याच्या पालकांना ईमेल पाठवला. यात त्याने लिहिले की, 'माझे ब्रेनवॉश किंवा काहीही झाले नाही. मी अनेक महिन्यांपासून हे नियोजन करत होतो. बाबा हे लोक खूप चांगले आहेत.'

सुलेमानला 29 सप्टेंबर 2021 रोजी हिथ्रो विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने ब्रिटनला परतण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्यावर दहशतवादाशी (Terrorism) संबंधित अनेक आरोप करण्यात आले.

Youth
Sudan Crisis: 'सुदानच्या राजदूताला संयुक्त राष्ट्रातून हटवा...', लष्कर प्रमुखाचे अँटोनियो गुटेरेस यांना पत्र

2014 मध्ये दहशतवादी संघटनेत सामील झाला

शुक्रवारी सुलेमानला एप्रिलमध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांसंबंधी दोषी करार दिला. 2014 मध्ये ISIS मध्ये सामील होण्यापूर्वी, वयाच्या 18 व्या वर्षी, तो व्हॉट्सअॅपवर मित्रांसोबत शिरच्छेदाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असे.

फिर्यादी डंकन ऍटकिन्सन म्हणाले की, 'ऑगस्ट 2014 मध्ये, तुर्कीमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्टीवर असताना, त्याने ISIS मध्ये सामील होण्यासाठी सीरियामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.

स्नायपर बनण्याचे त्याचे ध्येय होते. ISIS सोबत कैद्यांची देवाणघेवाण होण्यापूर्वी त्याला सुरुवातीला तुर्कीमध्ये ठेवण्यात आले होते.'

Youth
Sudan Crisis: बाजारपेठा अन् बँकांमध्ये लूट सुरु, आतापर्यंत 500 ठार; सुदानचा रक्तरंजित संघर्ष...!

सोशल मीडियावर प्रचार केला

ऍटकिन्सन पुढे म्हणाले की, 'सुलेमान इस्लामिक स्टेटमध्ये सामील झाला आणि त्याच्यासाठी अनेक गोष्टी केल्या. तो दहशतवादी संघटना आणि तिच्या विचारसरणीचा प्रचार करणारी सोशल मीडिया (Social Media) अकाऊंट चालवत असे.

त्याच्या शाळेतील मित्रांनी सांगितले की, संघटनेत सामील होण्यापूर्वी तो व्हॉट्सअॅपवर शिरच्छेदाचे व्हिडिओ शेअर करत असे. सुलेमानला जेव्हा आयएसच्या ताब्यात असलेल्या रक्का भागात पाठवण्यात आले, जिथे भीषण लढाई सुरु होती, तेव्हा तो आयएसला कंटाळला होता.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com