Manisha Rupeta: पाकिस्तानच्या महिला DSPला नातेवाईकच म्हणाले, 'ती काम करू शकणार नाही'

Manisha Rupeta पाकिस्तानची पहिली हिंदू महिला डीएसपी बनून महिलांसाठी आदर्श बनली आहे
Manisha Rupeta
Manisha RupetaDainik Gomantak

Manisha Rupeta Biography: हिंदू महिला मनीषा रुपेता यांनी पाकिस्तानची डीएसपी बनून इतिहास रचला आहे. मनीषा रुपेता (Manisha Rupeta) पाकिस्तानच्या पहिल्या हिंदू महिला डीएसपी बनल्या आहेत. मनीषा रुपेता पाकिस्तानातील जकूबाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. मनीषा रुपेता यांची नुकतीच डीएसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मनीषा रुपेताने 2019 मध्ये सिंध लोकसेवा आयोगाची (Sindh Public Service Commission) परीक्षा दिली होती, ज्यामध्ये तिला 16 वा क्रमांक मिळाला होता. मनीषा रुपेता हिने आधी मेडिकलची तयारी केली होती. तिला डॉक्टर होण्याची संधी असतांना, पोलिसांचा गणवेश घालून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा मनीषा रुपेताने पोलिस सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला

मनीषा रुपेताच्या इतर तीन बहिणींनी वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे तिनेही एमबीबीएसचे शिक्षण घेणे अपेक्षित होते, परंतु ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, तेव्हा तिने पोलिस सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. मात्र, नंतर मनीषा रुपेताने फिजिकल थेरपीमध्ये पदवी घेतली.

Manisha Rupeta
Pakistan Air Defence: ड्रॅगनचा पाकला दणका! संरक्षण प्रणाली देण्यास नाखूष

मनीषा रुपेता हिने 16 वा क्रमांक पटकावला

मला पोलिस सेवेची नोकरी खूप आवडली. मेडिकलच्या तयारीसोबतच मी सिंध लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचीही तयारी करत होती. पोलिसात नोकरी मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले, असे रुपेताने सांगितले. सिंध लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मनीषा रुपेता हिच्या मेहनतीला यश आले आणि तिने 16 वा क्रमांक पटकावला.

मनीषा रुपेताच्या नातेवाईकांनी तिला काय सांगितले?

पाकिस्तानची (Pakistan) पहिली हिंदू महिला डीएसपी मनीषा रुपेताने सांगितले की, त्याच्या डीएसपी झाल्यामुळे तिच्या समुदायातील लोक खूप आनंदी आहेत. मात्र, ती या क्षेत्रात जास्त काळ राहू शकणार नाही आणि तिला नोकरी बदलावी लागेल, असे तिच्या काही नातेवाईकांनी सांगितले.

Manisha Rupeta
US-China Conflict: तैवान मुद्द्यावर ड्रॅगन-अमेरिका पुन्हा आमने-सामने

तर दुसरीकडे चांगल्या कुटुंबातील महिला पोलिस ठाण्यात जात नाहीत हा समज मला बदलायचा आहे. साधारणपणे पाकिस्तानी महिला पोलिस ठाण्यात जाणे टाळतात. एखाद्या वेळी महिलेला पोलीस स्टेशनला कधी जावे लागले तर ती कुटुंबातील पुरुष सदस्यासोबत जाते. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले पाहिजे, असे मत रूपेताने व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com