दहशतवादी करत आहेत एका नव्या ‘ॲप’चा वापर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी संघटना आणि त्यांचे सूत्रधारांनी तुर्कस्तानमधील एका कंपनीने तयार केलेल्या मेसेजिंग ॲपचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. 

श्रीनगर : ‘व्हॉटस्‌ॲप’सारख्या सोशल मीडिया कंपन्यांतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये खासगीपणा कितपत राखला जातो, याबाबत नागरिक शंका उपस्थित करत असताना दहशतवादी संघटना मात्र नवीन ॲपकडे वळाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी संघटना आणि त्यांचे सूत्रधारांनी तुर्कस्तानमधील एका कंपनीने तयार केलेल्या मेसेजिंग ॲपचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. 

लष्कराने गेल्या काही दिवसांत ठार मारलेल्या किंवा शरण आलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या मोबाईलच्या तपासणीतून ही माहिती पुढे आली आहे. या ॲपच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी संघटना युवकांना चिथावणीही देत असल्याचे पुढे आले आहे. दहशतवादी तीन वेगवेगळे ॲप वापरत असल्याचे स्पष्ट झाले असून सुरक्षेच्या कारणास्तव या ॲपची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची स्वतःच्याच पक्षातून हकालपट्टी  

या तीन ॲपपैकी एक ॲप अमेरिकेतील, तर दुसरे ॲप ब्रिटनमधील कंपनीचे आहे. तिसरे ॲप तुर्कस्तानमधील कंपनीने तयार केले असून त्याचाच सध्या दहशतवादी संघटना अधिकाधिक वापर करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या ॲपच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांमध्ये भरतीही केली जाते. 

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी व्हॉट्‌सॲप आणि फेसबुक मेसेंजर या ॲपचा वापर करणे जवळपास बंद केले आहे. याचा शोध घेतला असता त्यांनी फुकट उपलब्ध असलेल्या काही ॲपचा वापर सुरु केल्याचे उघड झाले. या ॲपमध्ये तयार होणारा मजकूर संबंधित मोबाईल अथवा संगणकावरच रहात असल्याने तो गुप्त राहतो.‘व्हॉटस्‌ॲप’सारख्या सोशल मीडिया कंपन्यांतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये खासगीपणा कितपत राखला जातो, याबाबत नागरिक शंका उपस्थित करत असताना दहशतवादी संघटना मात्र नवीन ॲपकडे वळाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बायडन यांचा चीनला दणका; अमेरिकी युद्धनौका थेट घुसली दक्षिण चिनी समुद्रात

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी संघटना आणि त्यांचे सूत्रधारांनी तुर्कस्तानमधील एका कंपनीने तयार केलेल्या मेसेजिंग ॲपचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. लष्कराने गेल्या काही दिवसांत ठार मारलेल्या किंवा शरण आलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या मोबाईलच्या तपासणीतून ही माहिती पुढे आली आहे. या ॲपच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी संघटना युवकांना चिथावणीही देत असल्याचे पुढे आले आहे.

दहशतवादी तीन वेगवेगळे ॲप वापरत असल्याचे स्पष्ट झाले असून सुरक्षेच्या कारणास्तव या ॲपची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. या तीन ॲपपैकी एक ॲप अमेरिकेतील, तर दुसरे ॲप ब्रिटनमधील कंपनीचे आहे. तिसरे ॲप तुर्कस्तानमधील कंपनीने तयार केले असून त्याचाच सध्या दहशतवादी संघटना अधिकाधिक वापर करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या ॲपच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांमध्ये भरतीही केली जाते. 

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी व्हॉट्‌सॲप आणि फेसबुक मेसेंजर या ॲपचा वापर करणे जवळपास बंद केले आहे. याचा शोध घेतला असता त्यांनी फुकट उपलब्ध असलेल्या काही ॲपचा वापर सुरु केल्याचे उघड झाले. या ॲपमध्ये तयार होणारा मजकूर संबंधित मोबाईल अथवा संगणकावरच रहात असल्याने तो गुप्त राहतो.

संबंधित बातम्या