Watch: पुरुषांच्या कपड्यांचा कंटाळा आला, आता तो स्कर्ट अन् हाय हिल्स घालून फिरतो!

Mark Bryan: अमेरिकेत राहणारा मार्क ब्रायन पुरुषांचे कपडे घालण्याला कंटाळला होता. त्यामुळे त्याने महिलांचे कपडे घालण्यास सुरुवात केली.
Mark Bryan
Mark BryanDainik Gomantak

Mark Bryan: अमेरिकेत राहणारा मार्क ब्रायन पुरुषांचे कपडे घालण्याला कंटाळला होता. त्यामुळे त्याने महिलांचे कपडे घालण्यास सुरुवात केली. आता तो स्कर्ट आणि हाय हिल्स घालून ऑफिसला जातो.

मार्क ब्रायन म्हणतो की, कपड्यांना कोणत्याही प्रकारचे जेंडर नसते. त्याला त्याच्या ड्रेसिंग स्टाईलचा खूप अभिमान आहे. सध्या तो जर्मनीत राहतो. मार्कच्या या शैलीला त्याची पत्नी खूप सपोर्ट करते. मार्क स्वतःला हेट्रोसेक्सुअल म्हणून घेतो आणि त्याला तीन मुले आहेत.

हा व्यक्ती महिलांचे कपडे घालतो

मार्कने सांगितले की, त्याला सलग 20 वर्षे सूट-बूट घालण्याचा कंटाळा आला होता. मार्कने पुढे सांगितले की, तो 2015 पासून स्कर्ट आणि हाय हिल्स घालतो. मार्क ब्रायन हा व्यवसायाने रोबोटिक्स अभियंता आहे. त्याला पुरुष आणि स्त्रियांचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य आवडते.

ब्रायन सोबत त्याची पत्नी त्याच्यासाठी कपडे खरेदी करते. मार्क ब्रायनच्या पत्नीचे म्हणणे आहे की, माझ्या नवऱ्याने काहीही परिधान केले तरी तो खूप स्मार्ट दिसतो. तो माझ्यापेक्षा खूप जास्त हाय हिल्स आणि सँडल घालतो.

Mark Bryan
Baba Vanga Predictions: बाबा वेंगाचं 2023 चं भाकित ठरलं खरं, लवकरच येणार विनाशकारी वादळ!

इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स

ब्रायन सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय आहे. तो इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचे बहुतेक फोटो आणि व्हिडिओ स्कर्ट आणि हिल्समध्ये आहेत.

इन्स्टाग्रामवर (Instagram) त्याचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये लिहिले आहे - एक व्यक्ती ज्याला दररोज स्कर्ट आणि हाय हिल्स घालणे आवडते. मार्क एक रोबोटिक इंजिनियर तसेच मॉडेल आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com