Mars Perseverance Rover: नासाचा रोवर मंगळावर यशस्वीरित्या लॅंड

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

अमेरिकेच्या अंतराळ संस्था 'नासा' ने मंगळ ग्रहावर पर्सिवरेंस रोवर पाठविण्यात यश मिळविले आहे. सहा चाकांचा हा रोवर मंगळावर उतरल्यानंतर तेथिल विविध प्रकारची माहिती गोळा करणार.

केप कॅनावेरल. अमेरिकेच्या अंतराळ संस्था 'नासा' ने मंगळ ग्रहावर पर्सिवरेंस रोवर पाठविण्यात यश मिळविले आहे. अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने रात्री अडीचच्या सुमारास जेजोरो क्रेटर येथे मार्स सर्व्हायव्हल रोवर यशस्वीपणे उतरविला आहे. सहा चाकांचा हा रोवर मंगळावर उतरल्यानंतर तेथिल विविध प्रकारची माहिती गोळा करणार. या लाल ग्रहावर पूर्वी जीवन होते की नाही या संबंधी माहिती देणारे काही खडकं किंवा दगडं घेवून  येणार आहे.

जेजेरो क्रेटर  मंगळ ग्रहावरचा अत्यंत दुर्गम भाग आहे. येथे खोल दऱ्या आणि टोकदार पर्वत आहेत. यासह, वाळूचे ढिगारे आणि मोठ्या दगडांनी या दऱ्यांना अधिक धोकादायक बनवले आहे. अशा परिस्थितीत पर्सिवरेंस मार्स रोवर लँडिंगच्या यशावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. मंगळावर रोवर पाठविणारा अमेरिका जगातील पहिला देश ठरला आहे. असे म्हटले जात आहे की, जेजेरो क्रेटरवर पूर्वी नदी वाहत होती. जी एका तलावाला जावून मिळत होती. त्यानंतर तेथे पंखाच्या आकाराचा डेल्टा तयार झाला. शास्त्रज्ञ या पुराव्यांच्या आधारावर मंगळावर कधी जीवन होते का हे शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की जेव्हा या ग्रहावर पाणी वाहत होते तेव्हा मंगळावर जीवन असेल आणि ते तीन ते चार अब्ज वर्षांपूर्वी असेल. शास्त्रज्ञांना आशा आहे की तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञान आणि अवकाश विज्ञानाशी संबंधित मुख्य प्रश्नाचे उत्तर रोवरच्या माध्यामातून मिळेल. 'आम्ही या विशाल वैश्विक वाळवंटात एकटेच आहोत की अजून कोठेतरी जीवन आहे? आयुष्य कधी, कोठे अनुकूल परिस्थितीची देन देते का?'असे या प्रकल्पाचे वैज्ञानिक केन विलिफोर्ड म्हणाले.

ही नासाची नववी मंगळ मोहीम आहे
'पर्सविरन्स' हे नासाने पाठवलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा रोवर आहे. 1970 च्या दशकापासून अमेरिकेच्या अंतराळ संस्थेची ही नववी मंगळ मोहीम आहे. नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की रोवरला मंगळाच्या पृष्ठभागावर उतरायला लागलेला सात मिनिटांचा वेळ श्वास थांबविण्यासारखा होता. रोवर मंगळावर ज्या क्षणी यशस्वीरित्या उतरले त्या क्षणी वैज्ञानिकांचा  आनंद गगनाला भिडला होता.

संबंधित बातम्या