अफगाणिस्तान सरकारच्या माध्यम प्रमुखांची तालिबानकडून हत्या

अफगाणिस्तानातील (Afghanistan) स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली आहे.
अफगाणिस्तान सरकारच्या माध्यम प्रमुखांची तालिबानकडून हत्या
Dawa Khan Menapal Killed by taliban Dainik Gomantak

अमेरिकन लष्कराने (US Army) अफगाणिस्तान (Afghanistan) सोडल्यापासून तालिबान आणि अफगाणिस्तानच्या सैन्यात मोठा संघर्ष सुरू आहे. त्यातच आता एका स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तान सरकारच्या मीडिया विभागाच्या प्रमुखांची हत्या झाल्याचे समजते आहे. या वृत्तसंस्थेने ही बातमी पोलिसांना दिली आहे. (Taliban assassinates Afghan government media chief Dawa Khan Menapal)

अफगाणिस्तान सरकारच्या मीडिया माहिती केंद्राच्या प्रमुखांची आज राजधानीत हत्या करण्यात आली. अफगाणिस्तानच्या मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच तालिबानने इशारा दिला होता की, हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना लक्ष्य करतील. मंत्रालयाचे प्रवक्ते मीरवाईस स्टेनिकझाई यांनी दावा खान मेनपाल यांच्या मृत्यूबद्दल, ’दुर्दैवाने, क्रूर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले. एका अफगाण देशभक्ताला शहीद व्हावे लागले.’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Dawa Khan Menapal Killed by taliban
UNSC च्या विस्तारासाठी अमेरिकेने दिली मंजूरी; भारत स्थायी सदस्य बनणार?

अफगाणिस्तानच्या माध्यम माहिती केंद्राचे संचालक दावा खान मैनापाल यांच्या हत्येची जबाबदारी तालिबानने स्वीकारली आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी प्रसारमाध्यमांना संदेश पाठवला की, ‘दावा खान मैनापाल मुजाहिदीनच्या एका विशेष हल्ल्यात ठार झाले आहेत.’

Related Stories

No stories found.