मीना हॅरिस यांची संतप्त प्रतिक्रिया

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

 भारतात  गेल्या तीन  महिन्यांपासून कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्य़ांच्या आंदोलनाला देशातून तसेच परदेशातून पाठिंबा मिळत आहे.

नवी दिल्ली: भारतात  गेल्या तीन  महिन्यांपासून कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्य़ांच्या आंदोलनाला देशातून तसेच परदेशातून पाठिंबा मिळत आहे. अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस यांनी भारतात सुरु असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पांठिबा या आगोदरच दिला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून, ''जगातील मोठी लोकशाही धोक्यात आली आहे’’ असे म्हटले होते. त्यांनतर लगेच मीना हॅरिस यांनी आणखी एक ट्विट  करत  मी,'' भारतीय शेतऱ्यांच्या मानवाधिकारांच समर्थन  करत आहे. आणि  पहा मला कशा पध्दतीच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मी कोणाला घाबरणार  नाही  तसेच गप्प ही राहणार नाही.'' असं  यावेळी म्हटलं.

Chakka Jam: शेतकऱ्यांसह दिल्ली पोलिसही चक्का जामसाठी सज्ज

शेतकऱ्यांच्या  आंदोलनाला अंतरराष्ट्रीय  स्तरावरुन  मिळणाऱ्या  समर्थनामुळे  भारतातील  काही  संघटनाकडून  मीना हॅरिस, ग्रेटा थ्रेनबर्ग, मीया  खलिफा यांना विरोध  आहे. तसेच मीना  हॅरिस यांचा  विरोध  करत या संघटनानी त्यांचे पोस्टर जाळले आहे. त्यावर  मीना यांनी  संताप  व्यक्त  करत, '' दिल्ली  पोलिसांनी  सिंघू  बॉर्डरवरुन  अटक  केलेल्या नवदीप  कौर याला पाठिंबा दिला आहे. तसेच  भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप  करु  नका असं सांगणाऱ्याला  मीना  हॅरिस  यांनी चोख  प्रतियुत्तर  दिले. ते म्हणतात, ''मला  तुमच्या  मुद्दयापांसून  दूर  ठेवण्याचा  प्रयत्न  करु  नका. हे  भारतात सुरु  असणारे  मुद्दे  आमचे सुध्दा आहेत.'' काही मुद्द्यांना  विरोध  केला या कारणाने काही  कट्टरपंथीयांकडून  पोस्टर जाळण्या सारखे  विचित्र  प्रकार  घडत  आहेत.

सेलिब्रेटींच्या ट्विटर वॉरनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली प्रतिक्रिया

विचार करा जर आम्ही भारतात  असतो  तर  या  लोकांनी  काय  केले  असते. शेतकरी अंदोलनात  सहभागी  होणाऱ्या  नवदीप  कौरला  पोलिस  तुरुंगात  टाकून  त्याच्यावर अनन्वित अत्याचार करतात. त्याला  कोणत्याही  प्रकारचा  जामीन  न  देता  20 दिवसांपेक्षा अधिक  कालावधीसाठी  तुरुगांत  डांबल  जात  हे  खूप  वेदनादायक  आहे. आम्ही  केवळ  कृषी  कायद्याबद्द्लच  बोलत  नाहीत  तर  भारतात  अल्पसंख्यांकावर होत  असणाऱ्या  अत्याचाराबद्दल  ही आम्ही  बोलत  आहोत. त्यामुळे  मला  तुमच्या मुद्द्यापासून  दूर  ठेवण्याचा  प्रयत्न  करु  नका  हे  सगळे  मुद्दे  आमचेही  आहेत.'' अशा प्ररकारची संतप्त  प्रतिक्रिया  मीना  हॅरिस  यांनी दिली आहे.  

संबंधित बातम्या