Earth Research: पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? नव्या संशोधनात आलं समोर

Earth Neighbour Planet: संशोधनानुसार 'बुध' हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे.
Earth Research
Earth ResearchDainik Gomantak

संशोधकांच्या संशोधनानुसार शुक्र हा पृथ्वीसाठी सर्वात जवळचा ग्रह नसून बुध ग्रह हा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. बुध हा आपल्या सौरमालेतील इतर ग्रहांच्या सर्वात जवळ असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आले आहे.

  • पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?

    सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध हा आहे. आपल्या सौरमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. या लहान ग्रहाला स्वतःचा चंद्र नाही आणि तो सूर्याभोवती इतर सर्व ग्रहांपेक्षा वेगाने फिरतो, म्हणूनच रोमन लोकांनी त्याचे नाव swift-footed असे ठेवले. बुध हा पृथ्वीनंतरचा दुसरा सर्वात घनता असलेला ग्रह आहे.

    बुध ग्रहाचे बाह्य कवच फक्त 300 ते 400 मैल जाड आहे. त्याच्या प्रचंड गाभ्याचे आणि संरचनेचे संयोजन, ज्यामध्ये अस्थिर घटकांचा समावेश आहे, या सर्व गोष्टींमुळे शास्त्रज्ञांना वर्षानुवर्षे गोंधळात टाकले आहे. असं म्हणतात की पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह दिवस, महिना किंवा वर्षानुसार बदलत असतो.

Earth Research
Russia Deployed Nuclear Bomber: रशियाने तैनात केले 11 न्युक्लियर बॉम्बर; उपग्रह छायाचित्रातून आले समोर
  • मंगळ शुक्रापेक्षा पृथ्वीच्या जवळ होता

जेव्हा शुक्र,सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असतो तेव्हा तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या काळात शुक्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह असतो. काही वेळेस मंगळ हा सर्वात जवळचा ग्रह असतो.

  • बुध पृथ्वीपासून केवळ 35 दशलक्ष मैल दूर होता

दरम्यान, आता संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार बुध हा सर्वात जवळचा ग्रह असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2,000 वर्षांपूर्वी बुध पृथ्वीपासून केवळ 35 दशलक्ष मैल दूर होता. अशा घटना अत्यंत दुर्मिळ आहेत आणि हजारो वर्षांच्या अंतराने घडू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com