नॉर्वेत कोसळला उल्का पिंड

याअगोदर 2013 मध्ये एक उल्का(Meteorite ) रशियाच्या चेल्याबिन्स्क शहराजवळ पडली. यामुळे 1200 लोक जखमी झाले आणि बर्‍याच इमारतींचे नुकसानही झाले होते.
Meteorite collapses in Norway
Meteorite collapses in NorwayDainik Gomantak

नॉर्वेची(Norway) राजधानी ओस्लोजवळ(Oslo) रविवारी रात्री उशिरा एक उल्का(Meteorite) आकाशातून(Meteorite fallen from sky) खाली पडली आहे. या उल्काच्या आवाज आणि तेजस्वी प्रकाशामुळे लोकांना याबद्दल उत्सुकता निर्माण झाली असून काही लोक घाबरले पण याबद्दल लोकांमध्ये बरीच चर्चा झाली. मात्र अद्याप उल्कापिंडामुळे किती आणि काय नुकसान झाले आहे याबाबद्दल आणखीन सविस्तर माहिती मिळू शकली नाही.

नॉर्वे सरकारने उल्कापात पडण्याच्या घटनेचे विश्लेषण करीत, उल्का कोसळण्याचे ठिकाण ओस्लोपासून 60 किलोमीटर अंतरावर जंगलाचे क्षेत्र आहे असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. यावर सविस्तर माहिती मिळवण्यासाठी उल्का पडल्याने जे नुकसान झाले आहे ते पहाण्यासाठी शासकीय अधिकारी त्या ठिकाणाला भेट देणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. (Meteorite collapses in Norway)

Meteorite collapses in Norway
काय खरं काय खोटं ! एलियनला पाहण्याचे स्वप्न की सत्य?

आकाशातले आकर्षण बळ कमी झाल्याने या उल्का निर्माण होतात त्या उल्का खरतर आकाशात चमकणारे तारे असतात . ते वातावरणात येताच तयार झालेल्या घर्षणामुळे त्यांना आग लागते आणि त्यातील बहुतेक ज्वलंत असतात. यामुळे, ते जळतच पृथ्वीवर पडतात.

ही उल्का पडतांना पाहिलेल्या उल्का नेटवर्कच्या मॉर्टन बिलेटने सांगितले की उल्का पडताना तिचा वेग खूप जास्ती होता रविवारी दुपारपर्यंत त्यावरून कोणताही मलबा आढळला नाही. बिलेटच्या म्हणण्यानुसार ही संभाव्य उल्का शोधण्यात 10 वर्षे लागू शकतात.तसेच ही उल्का पडताना तिचा वेग प्रति सेकंद १५ ते २० किलोमीटर इतका होता.

याअगोदर 2013 मध्ये एक उल्का रशियाच्या चेल्याबिन्स्क शहराजवळ पडली. यामुळे 1200 लोक जखमी झाले आणि बर्‍याच इमारतींचे नुकसानही झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com