मेक्सिकन एअरफोर्सचे विमान कोसळले; 6 सैनिक ठार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार,  काल रविवारी वेराक्रूझ राज्यातील एमिलियानो झापता नगरपालिकेत मेक्सिकन हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात हवाई दलाचे किमान सहा सैनिक ठार झाले आहे.

3912 क्रमांक असलेला लिरजेट 45 या विमानाने एल लिन्सेरो विमानतळावरून रविवारी सकाळी 9.45 च्या सुमारास उड्डाण घेतल्यानंतर क्रॅश झाले. या दुर्घटनेत पायलट आणि सह-पायलटसह सहा सैनिक ठार झाले आहेत. रविवारी झालेल्या /या अपघातामागील कारण अद्याप समजू शकले नाही.

"मंत्रालयाचे हवाई अपघात अन्वेषण, न्यायिक आयोग लष्कर व हवाई दलाचे तपासणी व नियंत्रक जनरल या घटने संबंधित संभाव्य कारणे निश्चित करण्यासाठी संबंधित तज्ञ अहवाल सादर करतील," असे राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

संबंधित बातम्या