नील आर्मस्ट्राँगला सुरक्षितरित्या चंद्रावर उतरवणाऱ्या मायकल कोलिन्स यांचे निधन 

नील आर्मस्ट्राँगला सुरक्षितरित्या चंद्रावर उतरवणाऱ्या मायकल कोलिन्स यांचे निधन 
Michael collins.jpg

आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था नासाचे (NASA) माजी अंतराळवीर मायकल कोलिन्स यांचे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग (Neil Armstrong)  आणि बज एल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिले पाऊल  टाकले हे  आपणा सर्वाना माहीत आहे.  पण त्यांना यशस्वीरीत्या चंद्रावर पोहचविणारे आपोलो 11 (Apollo 11 Mission) या मोहिमेत अंतराळवीर मायकल कोलिन्स (Michael Collins)  हेदेखील त्यांच्यासोबत होते. मायकल कोलिन्स यांच्यामुळेच नील आर्मस्ट्राँग आणि बज एल्ड्रिन (Buzz Aldrin) आपली मोहीम पूर्ण करण्यात यशस्वी झाले.  (Michael Collins, who landed Neil Armstrong safely on the moon, has died) 

नील आणि बझ यांना सुरक्षितरित्या चंद्रावर घेऊन जाणे आणि त्यांना पृथ्वीवर परत आणणे हा  मायकल कोलिन्स यांचा मुख्य उद्देश होता.  अपोलो -11 मधून बाहेर पडल्यानंतर नील आणि बझ ज्या मॉड्यूलमध्ये चंद्रावर उतरले त्या मॉड्यूलचे नाव ईगल असे होते.  तिघांसाठीही ही मोहीम सोपी नव्हती.  तिघांचा प्रवास सुरू होताच त्यांचा पृथ्वीवरील रेडिओ संपर्क तुटला.  त्यानंतर संगणकात गडबड झाली. हे  सर्व कमी होते की म्हणून ईगलमध्ये इंधन कमी पडू लागले. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी तब्बल 40 हजाराहून अधिक लोकांनी परिश्रम आणि वेळेचे योगदान दिले होते.  मायकेल कोलिन्स यांच्या निधनानंतर नासाचे कार्यवाहक प्रशासक स्टीव्ह जुरासिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज जगाने खरा अंतराळवीर गमावला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. 

नील आणि बझ चंद्राच्या पृष्ठभागंवर पोहचल्यानंतर आपली  मोहीम पूर्ण करत होते तेव्हा मायकेल कोलिन्स आपल्या यानातून चंद्राच्या पृष्ठ भागावर फेऱ्या मारत होते. मायकेल कॉलिन्स यांचे नातू स्टीव्ह म्हणतो की,  मायकेल कॉलिन्स यांच्यामुळेच नील आणि बझ सुरक्षित पृथ्वीवर परत आले. आजोबांनी कर्करोगाविरूद्ध धैर्याने लढा दिला पण शेवटी या लढाईत त्याना पराभव स्वीकारावा लागला. तर, चंद्राच्या पृष्ठभागावर फिरवून मायकेल यांनी यांचे खूप मनोरंजन केले. अंतराळ मोहिमेत आम्हाला कोणत्या अडचणीचा सामना करावा लागू नये आणि आम्ही सुरक्षितरित्या पृथ्वीवर परत यावे यासाठी मायकेल यांच्याकडे 117 पानांची डायरी होती, अशी माहिती नील यांनी एका  मुलाखतीत सांगितले होते.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com