मायक्रोसॉफ्ट चीनविरोधात मैदानात; केला सायबर हल्ल्याचा गंभीर आरोप

दैनिक गोमन्तक
बुधवार, 3 मार्च 2021

भारतासोबत झालेल्या गलवान संघर्षानंतर चीन मधील काही हॅकर्सच्या समूहाने देशातील घुसखोरीचा प्रयत्न वाढविला असल्याची माहिती मिलत असतानाच, आता अमेरिकेतील मायक्रोसॉफ्टने चीन संबंधित एका हॅकर्सच्या गटाने आपल्या ईमेल सेवेत घुसखोरी करून प्रवेश केला असल्याची माहिती दिली आहे.

भारतासोबत झालेल्या गलवान संघर्षानंतर चीन मधील काही हॅकर्सच्या समूहाने देशातील घुसखोरीचा प्रयत्न वाढविला असल्याची माहिती मिलत असतानाच, आता अमेरिकेतील मायक्रोसॉफ्टने चीन संबंधित एका हॅकर्सच्या गटाने आपल्या ईमेल सेवेत घुसखोरी करून प्रवेश केला असल्याची माहिती दिली आहे. आज मायक्रोसॉफ्टने ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली असून, त्यात सॉफ्टवेअरमधील चार असुरक्षित गोष्टींमधून हॅकर्स मायक्रोसॉफ्ट एक्सचेंजच्या सर्व्हरमध्ये प्रवेश करू शकले. आणि त्यासोबतच त्यांनी ईमेल मध्ये जात दीर्घकालावधीसाठी राहिल असा व्हायरस सोडला असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. 

याशिवाय, मायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉग पोस्ट मध्ये या घुसखोरीमुळे एक्सचेंज ऑनलाईन प्लॅटफॉर्मला कोणतेच नुकसान झाले नसल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यानंतर मायक्रोसॉफ्टने चार असुरक्षित आढळलेल्या गोष्टींसाठी युझर्सला सॉफ्टवेअर पॅचेस किंवा फिक्सेस डाऊनलोड करण्याची सूचना केली आहे. तसेच हाफ्नियमने Hafnium ने हे कृत्य केले असल्याची माहिती मायक्रोसॉफ्टने दिली आहे. जी स्टेट पुरस्कृत आणि चीनच्या बाहेर कार्यरत असल्याचे समजते. 

चीन काही सुधरणार नाही! गलवान संघर्षानंतर चीनकडून सायबर हल्ल्यात मोठी वाढ

हफ्नियम Hafnium हे हॅकर्सचे एक नेटवर्क आहे जे अमेरिकेतील इंडस्ट्री सेक्टर, संसर्गजन्य रोग संशोधक संस्था, कायदे संस्था, उच्च शिक्षण संस्था, संरक्षण कंत्राटदार, थिंक टॅंक आणि नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन यांना लक्ष्य करत असल्याची माहिती मायक्रोसॉफ्टने दिली आहे. व ब्लॉगच्या माध्यमातून युझर्सला असुरक्षांसंबंधित गंभीर स्वरूप लक्षात घेऊन सिस्टमला त्वरित पॅच करण्याचे महत्त्व यावर जोर देण्यासाठी म्हणून माहिती देत असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. याव्यतिरिक्त, हफ्नियम Hafnium हा हॅकर्सचा समूह चीनमधील असल्याचे समजले जात असले तरी ते सहसा अमेरिकेत असलेल्या व्हर्च्युअल प्रायव्हेट सर्व्हरचा वापर करून घुसखोरी करत असल्याची माहिती मायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉग पोस्ट मधून दिली आहे.  

यानंतर, मायक्रोसॉफ्ट कडून करण्यात आलेल्या आरोपावर चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने, चीन हा कायद्याच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या सायबर-हल्ले आणि चोरीस विरोध व लढा देत असल्याचे सांगितले. तसेच सायबर हल्ला हा थेट दुसऱ्या देशाच्या सरकारशी जोडणे हा अत्यंत संवेदनशील राजकीय मुद्दा असल्याचे पुढे म्हटले आहे. आणि संबंधित मीडिया व कंपनी व्यावसायिक आणि जबाबदार वृत्ती स्वीकारतील अशी आशा चीनच्या प्रवक्त्यांनी केली आहे. तसेच अंदाज वर्तविण्याऐवजी पुराव्यावर आधारित आरोप करणे गरजेचे असल्याची पुस्ती देखील चीनच्या प्रवक्त्याने यावर जोडली आहे. 

संबंधित बातम्या