डिनर टेबलवरील प्रेमाचा घटस्फोटाने 'द एन्ड', 27 वर्षांनंतर बिल गेट्स-मेलिंडा झाले विभक्त

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 4 मे 2021

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी विवाहाच्या 27 वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमचे वैवाहिक संबंध संपवित आहोत. आता जीवनाच्या पुढील टप्प्यात ते एकत्र पुढे जाऊ शकत नाहीत.

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी विवाहाच्या 27 वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की आम्ही आमचे वैवाहिक संबंध संपवित आहोत. आता जीवनाच्या पुढील टप्प्यात ते एकत्र पुढे जाऊ शकत नाहीत.(Microsoft cofounders Bill Gates and Melinda Gates have decided to to end their marriage )

सध्या या निर्णयावर दोघांचेही एकमत झाले आहे. बिल गेट्स यांनी ट्विटरवर हे विधान पोस्ट केले. "आम्ही आमच्या नात्यावर खूप विचार केला. शेवटी आम्ही हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही एकत्र राहू शकतो यावर आम्हाला फारसा विश्वास राहिलेला नाही. आम्हा दोघांनाही आमची स्पेस वेगळी पाहिजे आहे आणि जीवनाच्या नवीन टप्प्याकडे आम्हाला जायचे आहे," असे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.

मात्र घटस्फोटानंतरही ते दोघेही बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनसाठी एकत्र काम करत राहण्याची घोषणा त्यांनी केली आहे. “आम्ही एक नवीन जीवन सुरू करणार आहोत, म्हणूनच लोकांकडून आमच्या कौटूंबिक स्पेस आणि प्राव्हसीची अपेक्षा करीत आहोत, असेही ते बोलले आहे. बिल आणि मेलिंडा यांनी 1994 साली हवाई येथे लग्न केले होते. 1987 मध्ये मेलिंडाने जेव्हा मायक्रोसॉफ्ट कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली तेव्हा दोघांची भेट झाली होती. एका रात्री कामाच्या संबंधात अरेंज केलेल्या डिनरच्या वेळी बिल गेट्सला मेलिंडा खूप आवडली होती.

संबंधित बातम्या