लष्करी तळांवर आगोदर हल्ला करायला पाहिजे होता नंतर...: ट्रम्प

सैनिक ज्या ठिकाणी मुक्काम करत होते त्या ठिकाणी आगोदर बॉम्ब फेकायला हवा होता, त्यानंतर शेवटी तेथून सैन्य माघारी बोलवायला हवे होते.
लष्करी तळांवर आगोदर हल्ला करायला पाहिजे होता नंतर...: ट्रम्प
Donald TrumpDainik Gomantak

अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अमेरिकेेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या टीका करत आहेत. तालिबानच्या कब्जामुळे अमेरिकेला आपल्या नागरिकांना परत मायदेशी आणण्यासाठी अतिरिक्त सैन्य पाठवावे लागले. त्यानंतर ट्रम्प यांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, नागरिकांना परत आणण्याची ही पद्धत अजिबात योग्य नव्हती. आधी अमेरिकन नागरिकांना येथून सुरक्षितरित्या बाहेर काढायला हवे होते आणि त्यानंतर सर्व शस्त्रे.

दरम्यान, ट्रम्प यांनी सुचवले की, अमेरिकेने सैन्य माघारीपूर्वी विदेशी सैनिकांच्या बेस कॅम्पवर बॉम्बस्फोट घडवायला हवा होता. ते म्हणाले, ''सर्वप्रथम तुम्हाला सर्व अमेरिकन नागरिकांना परत आणावे लागले मग तुम्हाला सर्व शस्त्रे आणावी लागली. ते पुढे म्हणाले, सैनिक ज्या ठिकाणी मुक्काम करत होते त्या ठिकाणी आगोदर बॉम्ब फेकायला हवा होता, त्यानंतर शेवटी तेथून सैन्य माघारी बोलवायला हवे होते. राष्ट्राध्यक्ष बायडन आणि अमेरिकी सैन्यांचे प्रमुखांनी मात्र त्याच्या उलट भूमिका घेतली. तालिबान्यांना हे कळले नसते की आपण तेथून कधी गेलो ते.''

Donald Trump
पाकिस्तनाचे पितळ उघड,तालिबानच्या मदतीला पाठवले 'दहशतवादी'

ट्रम्पवर नागरिक चिडले

मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलाचं ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्याचबरोबर त्यांच्या वक्तव्याचा विपर्यासही काही प्रमाणात झाला. ट्रम्प यांनी सैन्य माघार घेण्यापूर्वी लष्करी तळांवर (Trump on Troops Withdrawal) पहिल्यांदा बॉम्ब फेकायला पाहिजे होता नंतर सैन्यांना माघारी बोलवायला पाहिजे होते, या वक्तव्यावर सोशल मिडियावर यूजर्स चांगलेच चिडले. लोकांनी सांगितले की, ट्रम्प आपल्या स्वतःच्या सैनिकांवर बॉम्ब टाकण्यासंबंधी कसे काय बोलू शकतात. एका यूजर्सने म्हटले की, सैनिकांना बाहेर काढण्याआगोदर ट्रम्प बॉम्ब फेकण्याची भाषा ट्रम्प कशी काय शकतात. दुसर्‍या यूजर्सने म्हटले की, सैन्य बाहेर न काढता आम्ही लष्करी तळांवर बॉम्ब टाकू आणि कोणालाही कळणार नाही. कसं काय शक्य आहे.

Donald Trump
Afghanistan: दोन्ही डोळे फोडले, गोळ्या घातल्या; महिलेने सांगितली तालिबानच्या क्रौर्याची कहानी

अशरफ घनी यांना धोकेबाज म्हटले

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून ट्रम्प यांनी कधी बायडन तरी अशरफ घनी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अशरफ घनी यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्यावर कधीही पूर्ण आम्ही विश्वास ठेवला नाही. त्यांनी घनींना धोकेबाजही म्हटले. याशिवाय त्यांनी तालिबानचे कौतुक केले आणि त्यांना 'स्मार्ट' आणि 'चांगले सेनानी' म्हटले. “तालिबान चांगले लढाऊ आहेत. याचे श्रेय तुम्ही त्यांना द्यायला हवे. ते हजारो वर्षांपासून लढत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com